IIFA 2017 : Exclusive : बिपाशा बासू पोहोचली न्यूयॉर्कला; विमानतळावर कुणी ओळखेना!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 12:56 IST
बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंह ग्रोवर दोघेही मीडियावर नाराज असल्याची बातमी आपण कालच वाचली. तिने मीडियासोबत शेअर केलेल्या ...
IIFA 2017 : Exclusive : बिपाशा बासू पोहोचली न्यूयॉर्कला; विमानतळावर कुणी ओळखेना!!
बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंह ग्रोवर दोघेही मीडियावर नाराज असल्याची बातमी आपण कालच वाचली. तिने मीडियासोबत शेअर केलेल्या काही फोटोंवर नेटीजन्सनी आक्षेपार्ह कमेंट दिलेत आणि हेच कमेंट बिपाशाच्या नाराजीचे कारण ठरले. यानंतर म्हणे बिप्सने मीडियाला पोझ न देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, बिप्सने इकडे मीडियाला पोझ न देण्याचा निर्णय घेतला आणि दुसरीकडे ती आयफा अवार्ड 2017 साठी न्यूयॉर्कला रवाना झाली. अर्थात तिचा लाडका हबी करण सिंह ग्रोवर याच्यासोबत. बिप्स व करण दोघेही काल रात्री न्यूयॉर्कला पोहोचले. न्यूयॉर्कच्या जॉन एफ केनेडी विमानतळावर बिप्स व करण उतरले. ब्लॅक कलरचे टॉप, ब्लॅक जॅकेट, ब्लॅक टाईट्स आणि गर्द लाल रंगाचे लिपस्टिक अशा स्टाईलिश लूकमध्ये बिप्स विमानतळावर दिसली. ALSO READ: मीडियावर भडकली बिपाशा बसू! पोझ द्यायला दिला नकार!!अर्थात बिप्सला फार कुणी ओळखले नाही. भारतात बिपाशा व करण यांना सेलिब्रिटी अटेन्शन मिळत असले तरी न्यूयॉर्कच्या विमानतळावर त्यांना ओळखणारे कुणीच नव्हते. यावेळी बिप्सचा लाडका हबी करण आपल्या मॅनेजरसोबत लगेजची प्रतीक्षा करताना दिसला तर बिप्स निव्वळ टंगळमंगळ करताना दिसली. करण पूर्णपणे आपल्या बॅगच्या मागे होता तर स्टाईलिश बिप्स करणच्या मागे. आयफा अवार्डमध्ये सहभागी होण्याचा उत्साह बिप्सच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. न्यूयॉर्कला रवाना होण्यापूर्वीपासून बिपाशाचा उत्साह जणू ओसंडून वाहत होता. पुढील काही दिवस आयफा अवार्डच्या नावे...असे सांगत तिने या सोहळ्यासाठी न्यूयॉर्कला रवाना होत असल्याची माहिती तिच्या सोशल अकाऊंटवर दिली होती. आता बिप्स न्यूयॉर्कला पोहोचली आहे. इथे ती कशी एन्जॉय करते, ते आम्ही तुम्हाला सांगूच.