जेव्हा सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात केली होती तेव्हा तो एका डान्स ग्रुपमध्ये सहभागी झाला होता. पुढे तो आयफासारख्या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात डान्सर म्हणून परफॉर्मन्स करीत होता. आज नशिबाने सुशांत पुन्हा आयफात उपस्थित आहे, परंतु सुरुवातीचा काळ अन् आताचा काळ यात बराचसा फरक म्हणावा लागेल. कारण त्यावेळी तो एक डान्सर म्हणून आयफात येत होता, आज तो एक अभिनेता म्हणून आयफात सहभागी झाला आहे. तो केवळ सहभागीच झाला नाही, तो या महासोहळ्यात परफॉर्मन्सदेखील करणार आहे. शिवाय ‘आयफा-२०१७’मध्ये त्याला उत्कृष्ट अभिनयासाठी नामांकनही मिळाले आहे.
आयफाविषयीच्या आठवणी सांगताना सुशांत सांगतो की, ‘आयफा-२०१७ मध्ये मला परफॉर्मन्स करण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. मात्र मी पहिल्यांदाच न्यू यॉर्कमध्ये परफॉर्मन्स करीत आहे, असे अजिबात नाही. यामागे एक मोठी स्टोरी आहे. जेव्हा मी इंजिनिअरिंगचे तिसरे वर्ष सोडून मुंबईकडे निघालो होतो, तेव्हा मी एक बॅकग्राउंड डान्सर म्हणून परफॉर्मन्स करीत होतो. आज पुन्हा एकदा मी आयफामध्ये परफॉर्मन्स करणार आहे. मात्र तेव्हाचा आणि आताच्या परफॉर्मन्समध्ये बराच फरक असेल, हे निश्चित.
सुशांतने गेल्या काही वर्षांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळेच त्याला अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्याबरोबर एका कॅटेगिरीत नॉमिनेशन मिळाले आहे. त्याकरिता हे नॉमिनेशन खूपच महत्त्वपूर्ण आहे.