IIFA 2017 : कॅटरिना कैफने हजारो चाहत्यांच्या साक्षीने केले बर्थडे सेलिब्रेशन!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2017 20:11 IST
बॉलिवूडची आघाडीची नायिका कॅटरिना कैफ हिने आज हजारो चाहत्यांच्या साक्षीने तिचा ३४वा वाढदिवस साजरा केला. सध्या कॅट न्यू यॉर्कला ...
IIFA 2017 : कॅटरिना कैफने हजारो चाहत्यांच्या साक्षीने केले बर्थडे सेलिब्रेशन!!
बॉलिवूडची आघाडीची नायिका कॅटरिना कैफ हिने आज हजारो चाहत्यांच्या साक्षीने तिचा ३४वा वाढदिवस साजरा केला. सध्या कॅट न्यू यॉर्कला १८व्या आयफा-२०१७ मध्ये सहभागी झाली असून, याठिकाणी जेव्हा तिचा धमाकेदार परफॉर्मन्स झाला तेव्हा उपस्थितांनी तिला विष करण्यासाठी एकच कल्लोळ केला. प्रेक्षक तिला वारंवार ‘हॅप्पी बर्थडे कॅट’ असे म्हणत होते. कॅटनेदेखील सर्वांचे आभार मानले. न्यू यॉर्कला पोहोचताच कॅटला डिझ्नीकडून वाढदिवसाचा एक केक गिफ्ट केला होता. हा तिला मिळालेला तिसरा केक होता. केक बघून कॅट खूपच हरकून गेली होती. केकसोबतचा एक फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्याचबरोबर ३४वा बर्थडे आपल्या स्पेशल मित्रांबरोबर सेलिब्रेट करणार असल्याचेही तिने सांगितले होते. खरं तर यावेळचा वाढदिवस तिच्यासाठी स्पेशल होता. एक तर तिचा बहुप्रतिक्षित ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट रिलीज झाला होता. त्याचबरोबर ‘आयफा’ सोहळाही होता. त्यामुळे कॅटला सेलिब्रेशनचे चांगलेच निमित्त होते. असो जेव्हा कॅट तिचा परफॉर्मन्स करण्यासाठी स्टेजवर आली, तेव्हाच प्रेक्षकांमध्ये तिला बर्थडे विष केले जात होते. कॅटने तिच्या एकापेक्षा एक सरस गाण्यांवर आपला जलवा दाखवित परफॉर्मन्स केला. क्षणाक्षणाला प्रेक्षकांमधून तिला दाद दिली जात होती. जेव्हा तिचा परफॉर्मन्स संपला तेव्हा प्रेक्षकांनी एकच कल्लोळ करीत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कॅटनेदेखील प्रेक्षकांच्या या शुभेच्छा स्वीकारत त्यांचे आभार मानले. दरम्यान, कॅटने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘बूम’ या चित्रपटातून केली. या चित्रपटात तिने बरेचसे बोल्ड सीन्स दिले होते. त्यानंतर मात्र कॅटने कधीच मागे वळून पाहिले नाही. सध्या कॅट बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. कॅटचे सलमान खान याच्यासोबत सुरुवातीपासूनच नाव जोडले जात आहे. सध्या यांच्यात ब्रेकअप झाले असले तरी, त्यांच्यातील केमिस्ट्री आजही कायम आहे.