ऐकीकडे मोहित मारवाहच्या लग्नसमारंभात संपूर्ण कपूर खानदान दुबईमध्ये सेलिब्रेशन करीत होते, तर दुसरीकडे जान्हवी कपूर तिच्या आगामी ‘धडक’ या चित्रपटाची शूटिंग करीत होती. शूटिंगमुळेच ती या समारंभात सहभागी होऊ शकली नाही.
वृत्तानुसार, जेव्हा जान्हवीला मॉम श्रीदेवीच्या निधनाची बातमी समजली तेव्हा ती मुंबईतच होती. निर्माता करण जोहरने लगेचच जान्हवीचे घर गाठत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिला ही बातमी समजली तेव्हा ती बेशुद्ध झाली. रडून-रडून तिची अवस्था बिकट झाली आहे. जान्हवीची ही अवस्था बघून करण तिला काका अनिल कपूरकडे घेऊन गेला.
सुत्रानुसार, जान्हवी अजुनही अनिल कपूरच्या घरी आहे. रात्री उशिरापर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे. श्रीदेवीच्या अंतिम दर्शनासाठी सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही गर्दी केली आहे.