मूंछें हो तो..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:05 IST
शाहिद कपूरही सध्या मिशी वाढवलेल्या अवतारात दिसत आहे. याचे कारण विशाल भारद्वाज यांचा रंगून चित्रपट आहे. ज्यात तो कंगनाचा ...
मूंछें हो तो..
शाहिद कपूरही सध्या मिशी वाढवलेल्या अवतारात दिसत आहे. याचे कारण विशाल भारद्वाज यांचा रंगून चित्रपट आहे. ज्यात तो कंगनाचा जोडीदार आहे. नुकतीच त्याची शूटिंग सुरू झाली आहे. शाहिदने यापूर्वीही मौसम चित्रपटात मिशी ठेवली होती.देओल कुटुंबाची गोष्ट केली तर धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटात मिशी ठेवली. सनी आणि बॉबी देओल यांनीसुद्धा अनेक वेळा असे केले. गदरमध्ये सनीचा हा लूक लोकांना खूप आवडला. आता तर बॉबी देओलनेही मिशी वाढवली आहे. याबाबत विचारल्यावर, हा चितट्रासाठीचा गेटप असल्याचे तो सांगतो. चित्रपटाचे नाव मात्र तो सांगत नाही.अनिल कपूर यांनी यश चोपडा यांच्या लम्हे चित्रपटासाठी पहिल्यांदा आपली मिशी कापली होती. तर जॉकी श्राफ यांनी काशपासून अनेक चित्रपटात असे बलिदान दिले आहे. मात्र यानंतर त्यांनी आपली मिशी हीच आपली ओळख असल्याचे नेहमी सांगितले.आमिर खानने केतन मेहता यांच्या मंगल पांडे सिनेमात लांब मिशी ठेवली होती. शाहरुख खान- श्रीदेवीच्या आर्मीमध्ये शाहरुख पहिल्यांदा मिशी ठेऊन पडद्यावर आला. चक दे इंडियामध्येही तो मिशीत दिसला. सलमान खानलाही दबंग मध्ये त्याच्या मिशीसह प्रेक्षकांनी त्याला पसंत केले. काही वर्षांपूवी प्रकाश मेहरा यांच्या शराबी चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा तो संवाद हिट झाला होता. ज्यात ते मुकरीच्या मिशीवर फिदा होत एका खास स्टाईलने ते म्हणतात, 'मूंछें हों तो नथूलालजी जैसी, वरना न हों'. चित्रपटाच्या यशासोबतच हा संवादही नेहमीसाठी लोकप्रिय होऊन गेला. आजी कुणी कुणाची मिशी पाहिली की या संवादाचा उपयोग मिखास होतोच. शराबी चित्रपटामधील हा संवाद आज पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. याचे कारण, बाजीराव मस्तानीमध्ये रणवीर सिंगने ठेवलेली मिशी ठरली आहे. रणवीरने सिनेमाच्या प्रमोशनसाठीही या मिशीचा जोरदार वापर केला. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मात्र दीपिका पदुकोणने कॅमेरा समोर रणवीरची मिशी कापून टाकली. पण, म्हणून मिशीची चर्चा काही कमी झालेली नाही. रणवीरच्या आधीही अनेक स्टार्सनी आपला लूक वेगळा दिसावा यासाठी मिशीचा आधार घेतला आहे.