Join us

करिना सैफसारखा दिसत नाही तैमुर, तर दिसते या व्यक्तीची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 12:56 IST

जन्माला येण्यापासूनच तैमुर एक स्टार बनला होता.त्याची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी मीडियाची नजर फक्त आणि फक्त करिनाच्या बाळावरच होती. ...

जन्माला येण्यापासूनच तैमुर एक स्टार बनला होता.त्याची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी मीडियाची नजर फक्त आणि फक्त करिनाच्या बाळावरच होती. अखेर करिनाने बाळाला जन्म दिला आणि मीडियामध्ये करिनाच्या मुलाची सगळ्यांत जास्त चर्चा झाली.अख्खं बॉलिवूड करिनाला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी पोहचले.शेवटी हा नवाब सैफ अली खान आणि करिना कूपर यांचा मुलगा असल्यामुळे त्याला एक वेगळंच सेलिब्रेटी वलय आल्याचे पाहायला मिळाले. जन्मापासूनच स्टार बनलेला तैमुर आता आणखीन एका कारणामुळे चर्चेत आला आहे.ते कारण म्हणजे सोशल मीडियावर तैमुरची झलक पाहताच त्यांचे गोंडस फोटोला नटीझन्सने खूप सा-या कमेंट देत करिना आणि सैफला शुभेच्छाही दिल्या होत्या.मात्र आता तैमुरमध्ये करिना आणि सैफची झलकच दिसत नाहीय.तो करिना आणि सैफ यांच्यासारखा दिसतच नाही? असा प्रश्न खुद्द नवाब सैफनेच उपस्थित केला आहे.काही दिवसांपासून तैमुरच्या नावातही बदल करायचे आहे असे सैफने म्हटले होते.नावात बदल वगैरे करण्यापर्यंत ठीक होते, मात्र आता तो त्यांच्या आईवडिलांसारखाच दिसत नसल्याचे सैफचे म्हणणे आहे. एका कार्यक्रमात सैफला तैमुरविषयी अनेक प्रश्च विचारण्यात आले.त्यावेळी त्याने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. मात्र करिना आणि सैफ सारखा तैमुर दिसत नाही. तर ''तैमुर हा रणधीर कपूर यांच्या सारखा दिसत असल्याचे सैफने म्हटले आहे.आम्हा सर्वांना तो रणधीर कपूर यांच्या सारखा वाटत असला तरीही त्याचे डोळे मात्र माझ्या सारखेच असल्याचे सैफने सांगितले''.अनेक सेलिब्रेटींना त्यांच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणे टाळल्याचे पाहयला मिळाले.मात्र करिनाने त्याच्या बाळाची झलक स्वत:हुन सगळ्यांना दाखवली. करिनाने तीच्या प्रेग्नंसीपासून ते बाळांतपणापर्यंत सगळ्या गोष्टी मीडियात शेअर केल्या.