Join us  

'काम नसेल तर माझ्या शेतात मजूरीला ये', 'त्या' पंजाबी आजीने कंगनाला सुनावले खडे बोल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 9:17 AM

महिंदर कौर म्हणाल्या की, त्यांचं वय ८७ वर्ष आहे. आजही त्या शेतात काम करतात. त्या शेतकऱ्यांच्या संघर्षात कधीच मागे राहिल्या नाही आणि पुढेही राहिल्या नाहीत.

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला पंजाबच्या वयोवृद्ध महिलेवर पैसे घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याचा आरोप करणं आणि त्यांची खिल्ली उडवणं महागात पडत आहे. यावरून कंगनावर टिकेची झोड उठत आहे. आता त्याच वयोवृद्ध आजी म्हणजे भटिंडाच्या जंडियां गावातील महिंदर कौर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यातून त्यांनी कंगनाला उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, त्यांच्याकडे १३ एकर जमीन आहे. त्यांना १०० रूपयांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आणि हो कोरोनामुळे तिच्या(कंगना) कमा नसेल तर माझ्या शेतात इतर मजूंराप्रमाणे काम करू शकते.

महिंदर कौर म्हणाल्या की, त्यांचं वय ८७ वर्ष आहे. आजही त्या शेतात काम करतात. त्या शेतकऱ्यांच्या संघर्षात कधीच मागे राहिल्या नाही आणि पुढेही राहिल्या नाहीत. त्या शेतकरी आहे त्यामुळे या आंदोलनात आपल्या शेतकरी भावांसोबत आली आहे. शेती करणं फार मोठी गोष्ट आहे. हे काही छोटं काम नाही. शेतातील प्रत्येक काम केलं आहे.' (कंगनाने डिलीट केलेलं 'ते' ट्विट व्हायरल, शेतकरी आंदोलनातील वयोवृद्ध आजीची उडवली खिल्ली)

महिंदर कौर पुढे म्हणाल्या की, मुख्य मुद्दा हा आहे की, या अभिनेत्री पंजाब आणि पंजाबच्या शेतकऱ्यांची समज नाही. समज असती तर अशाप्रकारचं वक्तव्य कधी केलं नसतं. अशाप्रकारचं वक्तव्य करणं हे डोकं नसल्याचं लक्षण असतं. ती सरकारच्या भक्तीत मनात येईल ते बोलत आहे. तिला इतकंही नाही माहीत की, कुणाबाबत काय बोलावं. जेव्हा तिचं मुंबईतील ऑफिस तोडलं गेलं तेव्हा पूर्ण पंजाबने तिला साथ दिली होती.

त्या म्हणाल्या की, तिने एक महिला असून एका वयोवृद्ध महिलेवर अशाप्रकारे वक्तव्य करण्याआधी विचार करायला हवा होता. हे वक्तव्य पंजाबच्या महिलांवर करण्यात आलं. त्यामुळे तिने माफी मागावी. पैशांसाठी काम करणारे शेतकरी आम्ही नाहीत, पैशांसाठी तेच काम करतात जे स्वत:ला विकतात. आम्ही भाडं घेणारे नाही तर लोकांना रोजगार देणारे आहोत'.

 काय केलं होतं कंगनाने ट्विट?

अभिनेत्री कंगना रनौतने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या वयोवृद्ध महिलेबाबत ट्विट केलं होतं की, ही १०० रूपयात अव्हेलेबल आहे. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तिच आहे. यानंतर सोशल मीडियावरून कंगानाचा विरोध होऊ लागला होता. मग तिने ट्विट डिलीट केलं होतं. 

टॅग्स :कंगना राणौतपंजाबबॉलिवूडसोशल व्हायरल