Join us  

एकटे असाल तर या अभिनेत्रीचा व्हिडीओ चुकवू नका, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 4:20 PM

ती ‘प्यार का पंचनामा 3’मध्ये दिसणार आहे. नुसरत या आपल्या आगामी चित्रपटाबद्दल कमालीची उत्सूक आहे.

कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांशी आणि फॅन्सशी संवाद साधत असतात. आपल्या जीवनातील घडामोडी, विविध फोटो, व्हिडिओ आणि आगामी प्रोजेक्टसची माहिती शेअर करत असतात. त्यामुळे फॅन्सना आपल्या लाडक्या कलाकाराची माहिती आणि त्यांचे कधीही न पाहिलेले रुप फोटो तसंच व्हिडिओमधून पाहायला मिळतं. नुकतंच सोशल मीडियावर अभिनेत्री नुसरत भरूचाने पुलमध्ये चिल करताने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यांत तिचा हॉट आणि बोल्ड अंदाजा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या फोटोत बिकीनीमध्ये पाहायला मिळते आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते एकसे बढकर एक कमेंटस आणि लाईक्स देत असल्याचे पाहायला मिळत आहेत. 

 

नुसरतच्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले होते. अगदी अनपेक्षितरित्या या चित्रपटाने १०८.७१ कोटींची कमाई करत, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. हा चित्रपट एक सरप्राईज हिट होता. साहजिकचं नुसरत भारूचा आणि कार्तिक आर्यन या चित्रपटातील दोन्ही लीड कलाकारांना याचा सर्वाधिक फायदा मिळाला. सिनेमातील नुसरतच्या कामाचं खूपच कौतुक झालं. तिचं काम पाहून तिला एका दिग्दर्शकांनी दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यासाठी १ कोटींची ऑफर देऊ केली होती. मात्र तिनं ही ऑफर नाकारली आहे. माझ्या मते पैसा महत्त्वाचा नसतो, तुम्ही नेहमी चांगल्या कामाच्या शोधात असलं पाहिजे. गुणवत्तेवर तुम्ही जास्त भर दिला पाहिजे असं नुसरतचं मत आहे म्हणूनच तिनं ही ऑफर नाकारली होती.

जर कथा चांगली असेल तर आपण नक्कीच प्रादेशिक चित्रपटात काम करू, अभिनेत्री म्हणून एखादी भूमिका मला भावली पाहिजे ती भूमिका आव्हानात्मक असली पाहिजे, माझ्यासाठी काम करताना पैशांपेक्षा या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत असं नुसरतनं स्पष्ट केलं आणि याच कारणामुळे तिनं ही ऑफर नाकारल्याचं समजत आहे. विशेषत: कार्तिकच्या हातात सध्या अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. नुसरतचे म्हणाल तर लवकरच ती ‘प्यार का पंचनामा 3’मध्ये दिसणार आहे. नुसरत या आपल्या आगामी चित्रपटाबद्दल कमालीची उत्सूक आहे.

अलीकडे एका मुलाखतीत तिने आपली ही उत्सुकता बोलून दाखवली. ‘प्यार का पंचनामा 3’बद्दल मी प्रचंड उत्सूक आहे. कारण या फ्रेन्चाईजीच्या तिसऱ्या भागाची कथा मुलींच्या दृष्टिकोनातून लिहिली गेली आहे. अखेर मी बदला घेणार आहे. सूड उगवणार आहे,असे तिने सांगितले. एकंदर काय तर नुसरत भरूचा आपल्या या आगामी चित्रपटात मेल अ‍ॅक्टर्सवर भारी पडताना दिसणार आहे. अशात तिची उत्सुकता साहजिक आहे.

टॅग्स :नुसरत भारूचा