जर, रिचा चड्ढा मांजर असती!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 11:41 IST
बॉलिवूडची कुठलीही अभिनेत्री घ्या,तिची इच्छा काय असेल? तर बॉलिवूडमध्ये ‘नंबर 1’ अभिनेत्री बनण्याची, होय ना? पण म्हणतात ना, काही अपवाद असतात. अभिनेत्री रिचा चड्ढा याला अपवाद म्हणायला हवी. कारण रिचाला ‘नंबर 1’ होण्यात इंटरेस्ट नाहीच. तिला तर काही वेगळेच व्हायचेय. काय माहितीयं?
जर, रिचा चड्ढा मांजर असती!!
बॉलिवूडची कुठलीही अभिनेत्री घ्या,तिची इच्छा काय असेल? तर बॉलिवूडमध्ये ‘नंबर 1’ अभिनेत्री बनण्याची, होय ना? पण म्हणतात ना, काही अपवाद असतातच. अभिनेत्री रिचा चड्ढा याला अपवाद म्हणायला हवी. कारण रिचाला ‘नंबर 1’ होण्यात इंटरेस्ट नाहीच. तिला तर काही वेगळेच व्हायचेय. काय माहितीयं? रिचाला म्हणे मांजर व्हायचेय. रिचाच्या घरी एक पाळीव मांजर आहे. या आपल्या मांजरीचा फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर करत, रिचाने तिच्या मनातील मांजर होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. फोटोसोबत रिचाने एक व्हिडिओही शेअर केला आहे. ‘पाऊस आला की, कमली(रिचाच्या मांजरीचे नाव) उड्या मारायला लागते. पावसाचा पाऊस ऐकताच पळत सुटते. काश!!! मी सुद्धा एक मांजर असते, तर किती छान झाले असते. आपल्या मर्जीने फिरले असते, वाट्टेल तिथे रेंगाळले असते. ना काम, ना चिंता. ना कणीक मळण्याची चिंता, ना मुलाची, ना शरिराची, ना पर्यावरणाची. केवळ आराम आणि आराम. तिच्यासाठी गोरखपूर आणि चार्लोट्सविले एकसारखे आहे. काश, मी मांजर असते, असे रिचाने म्हटलेय. सोबत अर्थातच आपल्या लाडक्या मांजरीचा एक फोटोही शेअर केला आहे. आता मांजर होण्याची रिचाची इच्छा या जन्मी तर पूर्ण होणारी नाही. किमान मांजरीसारखे स्वच्छंदी म्हणजेच मनासारखे आयुष्य रिचाला जगता यावे, या शुभेच्छा तिला देऊयात!रिचाचा ‘फुकरे रिटर्न्स’ हा चित्रपट येतो आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिचाने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले होते. आव्हानात्मक भूमिकांसाठी रिचा ओळखली जाते. तिच्यासाठी कुठलीही भूमिका कमी दर्जाची नाही. रिचाने आत्तापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि प्रत्येक भूमिकेला न्याय दिला.