Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्मावत’ रिलीज झाला तर ‘जोहार’च्या आठवणी ताज्या करू ! राजस्थानातील महिलांचा इशारा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 13:29 IST

संजय लीला भन्साळी यांनी आपल्या चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ केले. पण तरिही या चित्रपटाच्या रिलीजच्या मार्गातील अडचणी संंपण्याचे नाव ...

संजय लीला भन्साळी यांनी आपल्या चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ केले. पण तरिही या चित्रपटाच्या रिलीजच्या मार्गातील अडचणी संंपण्याचे नाव घेत नाहीयेत. होय, आता या चित्रपटाच्या विरोधात राजस्थानातील महिलाही पुढे सरसावल्या आहेत. या महिलांनी ‘पद्मावत’ रिलीज झाला तर ‘जोहार’ची धमकी दिली आहे.अलीकडे चित्तोडगड येथे सर्व समाजाची बैठक झाली. या बैठकीत ‘पद्मावत’ला विरोधातील आंदोलनाची नवी रणनिती ठरवण्यात आली. त्यानुसार, महिलांनी हा इशारा दिला. येत्या २५ जानेवारीला ‘पद्मावत’ रिलीज झाला तर आम्ही  ‘जोहार’च्या आठवणी पुन्हा ताज्या करू, असे या महिलांनी म्हटले आहे. चित्तोडगडच्या ज्या किल्लयावर राणी पद्मावतीने  ‘जोहार’ केले होते, त्याचठिकाणाहून या महिलांनी हा इशारा दिला. करणी सेनेचे संरक्षक लोकेन्द्र सिंह कालवी यांनी हे आंदोलन १७ जानेवारीपासून सुरु होईल, असे सांगितले.अलाऊद्दीन खिल्जीने युद्ध छेडले आणि या लढाईत चित्तोडचे अनेक सैनिक मारले गेले. युद्धात राजा रतनसिंह यांचाही मृत्यू झाला. चित्तोडचा अभेद्य किल्ला मुघलांनी भेदला. पण मुघलांच्या हाती लागण्यापेक्षा किल्ल्यातल्या स्त्रियांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. राणी पद्मावतीने किल्ल््याच्या आत चितेत उडीत घेण्याचा निर्णय घेतला. स्त्रियांना बंदी बनवण्यास खिल्जीने किल्ल्यात प्रवेश करताच राणी पद्मावती यांच्यासह सुमारे १६ हजार महिलांनी सामूहिक चितेमध्ये उडी घेतली. सतीच्या या प्रकारालाच राजस्थानमध्ये ‘जोहार’ म्हणतात.ALSO READ : रिलीज आधीच दीपिका पादुकोणच्या 'पद्मावत'चे कोटींचे नुकसानशूटींगच्या पहिल्या दिवसापासून भन्साळींचा ‘पद्मावत’ वादात सापडला आहे. अनेक वादानंतर काही दुरूस्त्यांसह सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या रिलीजला परवानगी दिली. पण यानंतरही करणी सेनेने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी लावून धरलीय. करणी सेनेचा विरोध बघता राजस्थान सरकारने हा चित्रपट त्यांच्या राज्यात रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विरोध फक्त राजस्थान पुरता मर्यादित नाही आहे तर देशातल्या अन्य राज्यांमध्ये समान स्थिती आहे. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात सारख्या राज्यांमध्येही ‘पद्मावत’ला जोरदार विरोध होतो आहे.