Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओळखा पाहू उर्वशीची आई आहे की बहिण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 11:01 IST

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचा एक फोटो समोर आला आहे.या फोटोमध्ये ती तिच्या आईसोबत पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून ...

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचा एक फोटो समोर आला आहे.या फोटोमध्ये ती तिच्या आईसोबत पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही की या दोघी मायलेकी आहेत. हा फोटो पाहून तुम्हाला एक जाहीरात नक्कीच आठवेल.आपकी त्वचा से उम्र का पता ही नहीं चलता ही जाहिरात तु्म्हाला नक्कीच आठवेल.फोटोतील उर्वशी रौतेलासोबत असणारी दुसरी महिला दुसरी तिसरी कुणी नसून तिची आई आहे.उर्वशीच्या आईचं सौंदर्य,अदा पाहून तुम्हाला ती आई नसून तिची बहिणच आहे असा समज होईल. मात्र ती दुसरी महिला म्हणजे उर्वशीची आई मीरा रौटेला आहे.सौंदर्याच्या बाबतीत उर्वशीची आई तिच्यापेक्षा बिल्कुल कमी नाही. या वयातही उर्वशीच्या आईने स्वतःला व्यवस्थित मेंटेंन ठेवल्याचे या फोटोत पाहता येईल. काही दिवसांपूर्वी उर्वशी आणि तिच्या आईला ऑस्ट्रेलियातील मिस्टर एंड मिसेस ऑस्ट्रेलिया आणि मिस्टर एंड मिसेस मेलबर्न या स्पर्धेचे जज म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.2013 साली मीरा रौतेला यांनी लंडनमध्ये बेस्ट ब्राइडल मेकअप पुरस्कार पटकावला होता. त्यांना सौंदर्य स्पर्धेचा दहा वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळेच की काय उर्वशीसह मीरा रौतेलालाही स्पर्धेचे जज म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मीरा आणि त्यांचे कुटुंबीय उत्तराखंडच्या कोटद्वार इथं राहणार आहेत. मीरा रौतेलाला पर्यटनाची आणि फिरण्याची आवड आहे.बालपणापासूनच मीरानं उर्वशीला मॉडेलिंगसाठी तयार केलं.मात्र मीरा रौतेला यांचा लेकीसोबतचा फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला नाही तरच नवल.