Join us

लपून-छपून आईसक्रीम खायची बेबो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 05:00 IST

 लहानपणी गोलमटोल असणारी बेबो अर्थात करीना कपूर आता चवळीच्या शेंगेसारखी सडसडीत झालीयं. गोड पदार्थ तिला अगदी वर्ज्य्र आहेत. ...

 लहानपणी गोलमटोल असणारी बेबो अर्थात करीना कपूर आता चवळीच्या शेंगेसारखी सडसडीत झालीयं. गोड पदार्थ तिला अगदी वर्ज्य्र आहेत. अगदी आईसक्रीम सुद्धा. पण माहितीयं, लहानपणी बेबो चोरून लपून आईसक्रीम खायची. आपल्या पॉकेटमनीचे सर्व पैसे आईसक्रीमवर खर्च करायची.करीनाने आज शुक्रवारी एका आईसक्रीम ब्रँडचा नवा फ्लेवर ब्राउनी लाँच केला. यावेळी तिने आईसक्रीमबाबतचे अनेक किस्से पत्रकारांशी शेअर केले. आई मला आईसक्रीम खायला मनाई करायची. शाळेत असताना आईसक्रीम खायला मिळायचे. पण सुट्टया लागल्या की घरी जायला लागायचे. घरी जायचे म्हणजे आईसक्रीम खायला मिळणार नाही. म्हणून मग मी घरी पोहोचण्यापूर्वी मनसोक्त आईसक्रीम खाऊन घ्यायचे. अगदी माझ्याजवळ असतील नसतील तेवढ्या पैशाचे. घराच्या लिफ्टमध्ये पोहोचण्यापूर्वी मी दोन तीन आईसक्रीम गटकून घ्यायचे, असा एक किस्सा बेबोने ऐकवला. आता मात्र बंदी नाही. माझ्याइतकेच सैफलाही आईसक्रीम आवडते. कधीकधी तर मला त्याला खूप झाले म्हणून सांगावे लागते, असेही तिने सांगितले.करिनाचा ‘की अ‍ॅण्ड का’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.