बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान(Saif Ali Khan)ने १९९१ मध्ये अमृता सिंग(Amruta Singh)शी लग्न केले. त्यांना इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) ही दोन मुले आहेत. लग्नाच्या १३ वर्षानंतर २००४ मध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंगचा घटस्फोट झाला. अलिकडेच इब्राहिम अली खानने त्याच्या पालकांच्या घटस्फोटाचा त्याच्या आयुष्यावर झालेला परिणामाबद्दल खुलासा केला. त्याने सैफ आणि करीनाच्या नात्याबद्दलही सांगितले.
राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत इब्राहिम अली खान म्हणाला, ''मी चार-पाच वर्षांचा होतो, म्हणून मला फारसे आठवत नाही. कदाचित सारासाठी ते वेगळे होते, कारण ती मोठी होती. पण माझ्या आई-वडिलांनी मला घर तुटल्याचे दुःख जाणवू नये याची पूर्ण काळजी घेतली. मी त्यांना कधीही एकमेकांवर रागावताना पाहिले नाही.''
'माझे वडील बेबोसोबत खूप खूश आहेत'इब्राहिम अली खान पुढे म्हणाला की,''आता माझे वडील बेबो (करीना कपूर) सोबत खूप खूश आहेत आणि माझे दोन खूप सुंदर व खोडकर भाऊ आहेत. माझी आई सर्वात चांगली आई आहे. ती माझी खूप काळजी घेते आणि मी तिच्यासोबत राहतो. सर्व काही छान आहे.'' अमृता सिंगशी घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अली खानने २०१२ मध्ये करीना कपूरशी लग्न केले. सैफ आणि करीनाला तैमूर आणि जेह ही दोन मुले आहेत.
सैफ अली खानवरील झालेल्या हल्ल्यावर इब्राहिम म्हणाला...दरम्यान इब्राहिमने सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याबद्दलही सांगितले. त्याने सांगितले की, ''जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा तो रात्रीच्या शिफ्टमध्ये शूटिंग करत होता. हल्ल्यानंतर जेव्हा तो त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचला तेव्हा सैफने त्याला सांगितले की, जर तू तिथे असतास तर तू त्या माणसाला मारले असतेस.'' इब्राहिमने सांगितले की, ''हे ऐकून तो रडला.''