Join us

मी कधीच दिग्दर्शक होऊ शकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 13:01 IST

 आलिया भट्ट सध्या तिच्या करिअरच्या अत्युच्च टोकावर  असून तिला अनेक प्रोजेक्ट्स सहज मिळताना दिसत आहेत. अभिनयाच्या क्षेत्रात तिला अनेक ...

 आलिया भट्ट सध्या तिच्या करिअरच्या अत्युच्च टोकावर  असून तिला अनेक प्रोजेक्ट्स सहज मिळताना दिसत आहेत. अभिनयाच्या क्षेत्रात तिला अनेक चित्रपट मिळत असतील पण तिची देखील एक खंत आहे. ती म्हणजे तिला कधीही दिग्दर्शक होता येणार नाही.निर्माता महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांनी सांगितले की, आलियाने निर्माता व्हावे पण, कधीही दिग्दर्शक होऊ नये. ’ यावर बोलताना आलिया म्हणते,‘ मी निर्माता एकवेळ होऊ शकेन पण माझ्यात दिग्दर्शक होण्याची क्षमता नाहीये. चित्रपट बनवताना माझ्या आईवडीलांकडूनकोणताही सल्ला येत नाही. तर माझा दिग्दर्शक ठरवतो की, मी कशी भूमिका करायला हवी.’गौरी शिंदे यांचा आगामी चित्रपट ‘डिअर जिंदगी’ मध्ये आलिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत शाहरूख खान देखील असणार आहे. चित्रपट २५ नोव्हेंबरला रिलीज होईल.