Join us  

'dabangg 3 च्या सेटवर मला कुत्र्यासारखी वागणूक दिली'; सलमानसह बॉडीगार्डवर अभिनेत्रीने केले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 8:57 AM

Hema sharma: या अभिनेत्रीने तिला सेटवर कशा प्रकारे वागणूक दिली यावर भाष्य केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) याचा दबंग (dabangg)  हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या सिनेमाची लोकप्रियता पाहता त्याचा दबंग 2 देखील आला. त्यानंतर आता दबंग 3 (dabangg 3) येण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे या सिनेमाविषयीचे अनेक अपडेट्स समोर येत आहेत. यामध्येच एका अभिनेत्रीने सलमान खानविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. इतकंच नाही तर सलमानसोबत त्याच्या बॉडीगार्डवरही तिने आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

अभिनेत्री हेमा शर्मा (hema sharma) हिने 'दबंग 3' च्या सेटवर मला कुत्र्यासारखी वागणूक दिली, असं म्हणत सलमानवर ताशेरे ओढले आहेत. ही घटना २०१९ मध्ये घडल्याचं तिने सांगितलं. एका मुलाखतीमध्ये ती बोलत होती.

"मला दबंग ३ मध्ये काम करायचं होतं आणि चित्रपटात काम करण्यासाठी माझ्या क्षमतेनुसार मी सगळं काही केलं होतं. कारण, मला सलमान खानला भेटायचं होतं. माझा पहिला सीन सलमान सरांसोबत होता. त्यामुळे मी खूप आनंदात होते. परंतु, ज्या सीनमध्ये मी होते ते सीन सलमान सरांशिवाय शूट करण्यात आले. शूट संपल्यानंतर मला सलमान सरांना भेटायचं होतं. त्यासाठी मी त्यांच्याशी संबंधित अनेक लोकांना भेटले सुद्धा", असं हेमा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "सलमान खानसोबत एक फोटो काढण्यासाठी मी जवळपास ५० लोकांना भेटे असेन. त्यावेळी मी पंडित जनार्दन यांना भेटले आणि माझी इच्छा सांगितली. त्यांनीही सलमानसोबत भेट घडवून देण्याचं आश्वासन दिलं. पण, सेटवर मला इतकं वाईट वागणूक दिली. पदोपदी माझा जो अपमान केला तो मी सांगू शकत नाही. सलमानच्या सुरक्षा रक्षकांनी मला कुत्र्यासारखं बाहेर फेकलं. १०० पेक्षा जास्त लोकांनी माझा अपमान केला.यात मला ओळखणारेही लोक होते. या घटनेमुळे मी १० दिवस झोपू शकले नाही."

दरम्यान, हा प्रकार घडत असताना सलमान तिथेच आजूबाजुला होते. त्यामुळे त्यांनी हस्तक्षेप केला असता तर नक्कीच होत असलेला हा प्रकार थांबला असता. पण, त्यांनी तसं केलं नाही. सध्या हेमाची ही मुलाखत चांगलीच चर्चेत येत आहे.

 

टॅग्स :सलमान खानदबंग 3बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा