Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, आई गमतीत बोलली! आलिया भटची सारवासारव !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 12:15 IST

कधी कधी वाटतं, मी खरेच पाकिस्तानात जावे. कदाचित मी तिथे आणखी मजेत राहू शकेल...’,आलिया भटची आई सोनी राजदान हिचे हे ताजे वक्तव्य. सोनी राजदान यांच्या या वक्तव्याचा एक अंक नुकताच गाजला. त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आता आलियाने आईच्या या वक्तव्यावर सारवासारव चालवली आहे.

‘मी काश्मीरसंदर्भात काही बोलते तेव्हा लोक माझ्यावर तुटून पडतात. मला देशद्रोही ठरवतात.  मला पाकिस्तानात जायचा सल्ला देतात. कधी कधी वाटतं, मी खरेच पाकिस्तानात जावे. कदाचित मी तिथे आणखी मजेत राहू शकेल...’,आलिया भटची आई सोनी राजदान हिचे हे ताजे वक्तव्य. सोनी राजदान यांच्या या वक्तव्याचा एक अंक नुकताच गाजला.  त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आता आलियाने आईच्या या वक्तव्यावर सारवासारव चालवली आहे. होय, पाकिस्तानात जाण्यासंदर्भात माझी आई जे काही बोलली, ते सगळे गमतीत बोलली, असे आलियाने म्हटले आहे.

अलीकडे आलिया या संपूर्ण एपिसोडवर बोलली. माझी आई बोलली आणि लोकांनी तिला अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केले. हे पाहून मला प्रचंड वाईट वाटले. आई ते सगळे गमतीत बोलली होती. पण शेवटी जे बोलली ते बोलली. आता तिला यावर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. माझी आई दोन मुलींची आई आहे. एक अतिशय समजुतदार महिला आहे. तिलाही स्वत:ची काही मते आहेत. पण हे विचार व्यक्त करणा-यांना इथे ट्रोल केले जाते. मला हे अजिबाब आवडत नाही, असे आलिया म्हणाली.

तू काहीही बोलू नकोस. कारण लोक विचार न करता काहीही प्रतिक्रिया देतात, असे मी नेहमी आईला सांगत असते.  पाकिस्तानात जाण्यासंदर्भात माझी आई जे काही बोलली, ते तिचे व्यक्तिगत मत होते. तिला तिचे विचार मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. लोकांनी या विचारांवर आक्षेप घेण्याचे कारण नाही. ती जे बोलली ते बोलली. आता ती यावर खुलासे करत बसणार नाही, असेही आलिया म्हणाली.

टॅग्स :आलिया भट