Join us

मी मनापासून बोलते - सोनम कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2016 10:34 IST

बॉ लीवूड अभिनेत्री सोनम कपूर नेहमी तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. नुकतेच तिने एक वक्तव्य केले की, मी बोलताना ...

बॉ लीवूड अभिनेत्री सोनम कपूर नेहमी तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. नुकतेच तिने एक वक्तव्य केले की, मी बोलताना माझ्या हृदयापासून बोलते, त्यासाठी बुद्धीचा वापर करत नाही. ' आगामी चित्रपट 'नीरजा' च्या ट्रेलर रिलीजप्रसंगी पत्रकार परिषदेत बोलताना ती म्हणाली,' माझा प्रॉब्लेम हा आहे की, मी बोलताना माझ्या हृदयापासून बोलते. बुद्धीचा वापर मी करत नाही. नातेसंबंध सांभाळतांना देखील मी मनापासून निभावते. ' 'प्रेम रतन धन पायो' स्टार सोनम तिच्या स्वभावाविषयी सांगते की, तिचा स्वभाव थोडा लाजाळू प्रकारचा असल्याने तिला सतत क शाची तरी भीती वाटत राहते. स्टेजवर अचानक तिला बोलता येत नाही. किशोरवयीन असतान ती तिच्या आईच्या मागे लपायची. अभिनेत्रीसारखी काहीच पर्सनॅलिटी तिच्यात नव्हती.