कलाकार म्हणून अजून मी घडले नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 16:14 IST
प्राची देसाई हिने तिच्या करिअरला ‘कसम से’ मालिकेपासून सुरूवात केली. आत्तापर्यंत तिने अनेक चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. ...
कलाकार म्हणून अजून मी घडले नाही
प्राची देसाई हिने तिच्या करिअरला ‘कसम से’ मालिकेपासून सुरूवात केली. आत्तापर्यंत तिने अनेक चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. पण, तिला असे वाटते की,‘ एवढ्या चित्रपटात काम करूनही मला अद्याप कलाकार असल्यासारखे वाटतच नाही.मी व्यक्ती म्हणून जरी मोठी झाली असेल पण, माझ्या भूमिकेतून माझा समंजसभाव लक्षात येतो. माझ्या टॅलेंटला व्यापकता मिळाली नाही. मला वेगवेगळ्या कथानकावर आधारित आव्हानात्मक भूमिका करावयाच्या आहेत. बॉलीवूडमधील प्रत्येक कलाकार आज स्वत:चा विकास, विविध भूमिका हेच पाहतात. त्यामुळे बॉलीवूडमध्ये पर्मेनंट असे कोणीच नाही.’