Join us  

​माझे तुझ्या भावाशी कुठलेही नाते नाही...! राधिका आपटेने एकता कपूरला डिवचले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 5:29 AM

राधिका आपटे बॉलिवूडची एक बिनधास्त अभिनेत्री आहे. पडद्यावरची भूमिका जिवंत करण्यात राधिका कुठलीही कसर सोडत नाही. तिच्या रिअल लाईफबद्दल ...

राधिका आपटे बॉलिवूडची एक बिनधास्त अभिनेत्री आहे. पडद्यावरची भूमिका जिवंत करण्यात राधिका कुठलीही कसर सोडत नाही. तिच्या रिअल लाईफबद्दल बोलायचे तर, राधिका स्वत:च्या अटींवर आयुष्य जगते. कुणी फटकळ म्हणो, परखड म्हणो याची राधिका फार चिंता  करत नाही. अलीकडे राधिकाने नेहा धूपियाच्या बीएफएफ या शोमध्ये राजकुमार रावसोबत हजेरी लावली. या शोमध्ये बोलताना राधिकाने अनेक धक्कादायक खुलासे केलेत. एकता कपूरसंदर्भात विचारलेल्या प्रश्नालाही राधिकाने तितकेच धक्कादायक उत्तर दिले.२०११ मध्ये राधिकाचा ‘शोर इन द सिटी’ हा सिनेमा आला होता. या चित्रपटात एकता कपूरचा भाऊ तुषार कपूर मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटादरम्यान राधिका आणि तुषार यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. ‘शोर इन द सिटी’च्या सेटवर राधिका व तुषार यांची चांगलीच गट्टी जमली होती. यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले, असे म्हटले जाते. मात्र तुषारची बहीण एकता कपूर हिला राधिका जराही पसंत नव्हती. नेमक्या याचसंदर्भाने नेहाने राधिकाला प्रश्न विचारला. राधिका आपटे एकता कपूरसाठी कोण आहे? असा हा प्रश्न होता. यावर राधिका काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष असताना, माझ्याबद्दलचे निगेटीव्ह कमेंट मला जराही विचलित करत नाही, इथून राधिकाने सुरूवात केली. तुषार व माझ्या अफेअरच्या बातम्या कुठून कशा पसरल्या मला माहित नाही. त्यावेळी खरे तर मी लंडनमध्ये डान्स शिकत होते. माझ्याकडे तर तुषारचा नंबरदेखील नाहीय. या सगळ्या गोष्टी मला निव्वळ विनोद वाटतात. माझे तिच्या भावाशी कुठलेही नाते नाही, असे राधिका पुढे म्हणाली.ALSO READ : राधिका आपटेने ट्रोलर्सला दिले उत्तर; म्हटले, ‘बीचवर मी साडी घालून जायला हवे काय?’अलीकडे राधिका  ‘पॅडमॅन’या चित्रपटात दिसली होती. राधिकाबद्दल सांगायचे तर, २००५ मध्ये राधिकाने  ‘वाह, लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ‘शोर इन द सिटी’, ‘कबाली’,‘बदलापूर’, ‘मांझी- द माऊंटेन मॅन’ अशा अनेक चित्रपटांत राधिका दिसली आहे. हिंदी चित्रपटांशिवाय राधिकाने मराठी, तेलगू, तामिळ, मल्याळम चित्रपटातही काम केलेय. राधिकाची गणना मेनस्ट्रीम सिनेमाच्या टॉप मोस्ट अभिनेत्रींमध्ये होत नसली तरी तिची एक वेगळी फॅन फॉलोर्इंग आहे. दमदार अभिनयासाठी राधिका ओळखली जाते. तशीच एक बोल्ड अ‍ॅक्ट्रेस अशीही तिची ओळख आहे. तिच्या अनेक बोल्ड फोटोशूट आणि सीन्सवर वादंग माजले होते.