Join us

मी मावशी झालीय...करिश्मा कपूरने असा साजरा केला आनंद!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:49 IST

An overwhelmed Karisma Kapoor welcomes Kareena Kapoor Khan’s baby boy Taimur : Karisma Kapoor welcomes Kareena Kapoor Khan’s baby boy : Karisma Kapoor : करिना कपूरने आज सकाळी एका गोंडस मुलाला जन्म दिला. आई झाल्यानंतर करिनाला सगळ्यांत आधी शुभेच्छा देणारी व्यक्ती होती करिश्मा कपूर. होय, मावशी झाल्याचा करिश्माला प्रचंड आनंद झाला आणि मी मावशी झालीय, असे तिने तिच्या चाहत्यांशी शेअर केले.

करिना कपूरने आज सकाळी एका गोंडस मुलाला जन्म दिला. आई झाल्यानंतर करिनाला सगळ्यांत आधी शुभेच्छा देणारी व्यक्ती होती करिश्मा कपूर. होय, मावशी झाल्याचा करिश्माला प्रचंड आनंद झाला आणि मी मावशी झालीय, असे तिने तिच्या चाहत्यांशी शेअर केले. सकाळी ७.३० वाजता करिनाची प्रसूती झाली. करिना आई झाली, सैफ अली खान बाबा आणि करिश्मा मावशी. करिनाला बेबी बॉय झाल्याची न्यूज सगळ्यांत आधी करिश्माने इन्स्टाग्रामवर शेअर केली. It’s a baby boy. That makes me a Proud Maasi!  असा एक फोटो तिने पोस्ट केला. शिवाय “#proudmasi #blessed# newmemberinthefamily #joy#love#happiness #baby#taimuralikhanpataudi” अशा शब्दांत सैफिनाला शुभेच्छाही दिल्या. बेबो आणि लोलो यांचे एकमेकांशी अतिशय चांगले पटते. बहिणींपेक्षा त्या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहे. दोघीही अनेकदा एकत्र दिसतात. मग ती पार्टी असो वा डिनर डेट. करिना प्रेग्नंट असताना करिश्माने तिला सर्वाधिक मदत केली. करिश्माने करिनाला एक मोलाचा सल्लाही दिला होता. हा सल्ला म्हणजे, कुणाचाही सल्ला मानू नकोस. आई होण्याचा आनंद मनापासून साजरा कर आणि स्वत:च्या अनुभवातून शिक़ बहिणीचा हा सल्ला करिनानेही अगदी चांगलाच मनावर घेतला होता. त्यामुळेच प्रेग्नंसीचा काळ करिनाने अगदी मस्तपैकी एन्जॉय केला.सध्या करिश्मा लहानग्या तैमूरचे (करिना व सैफच्या मुलाचे नाव तैमूर अली खान पतौडी असे ठेवण्यात आले आहे.)कोडकौतुक  करण्यात गुंग आहे. मावशी बनल्याचा आनंद ती साजरा करतेय. आपणही करिश्माला मावशी बनल्याच्या शुभेच्छा देऊ यात. शुभेच्छा करिश्मा...!!!