Join us
Daily Top 2Weekly Top 5

​मी सुद्धा ‘दंगल’साठी दिले होते आॅडिशन; पण..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 15:42 IST

‘मसान’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिने ‘दंगल’मधील फातिमा सना शेख हिच्या अभिनयाची तोंडभरून स्तुती केलीय. ...

‘मसान’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिने ‘दंगल’मधील फातिमा सना शेख हिच्या अभिनयाची तोंडभरून स्तुती केलीय. यामागचे कारण म्हणजे, गीता फोगटच्या भूमिकेसाठी श्वेताने सुद्धा आॅडिशन दिले होते. खुद्द श्वेतानेच ही माहिती दिली.  मी सुद्धा ‘दंगल’मधील गीता फोगटच्या भूमिकेसाठी आॅडिशन दिले होते. मात्र माझ्याऐवजी या भूमिकेसाठी फातिमा सना शेख हिची निवड झाली. चित्रपट रिलीज झाल्यानंतर फातिमाचा अभिनय पाहून मी भारावून गेले. तिने दमदार अभिनय केलाय. माझा ‘हरामखोर’ चित्रपट लवकरच रिलीज होतोय. त्याचे ट्रेलर पाहून फातिमाने मला फोन करून माझ्या कामाची प्रशंसा केली होती. मी सुद्धा ‘दंगल’मधील तिच्या भूमिकेचे कौतुक केले होते, असे तिने सांगितले.श्रद्धा लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘हरामखोर’ या चित्रपटात दिसणार आहे. खरे हा चित्रपट चार वर्षांपूर्वीच तयार झाला होता. मात्र बालभारती आणि फिल्म बोर्डाच्या परवानगीविना रखडला होता. याबद्दलही श्वेता बोलली. ‘हरामखोर’ माझा पहिला सिनेमा होता. मात्र गत चार वर्षे तो रखडला होता. माझ्यासाठी हा अतिशय दु:खद अनुभव होता. पहिलाच सिनेमा असा रखडावा, या विचाराने मला निराश केले होते. बालभारतीला या चित्रपटाच्या पोस्टरवर आक्षेप होता. चित्रपटाचे पोस्टर आणि बालभारतीचा लोगो यात बºयाच अंशी साम्य असल्याने बालभारतीने यावर आक्षेप नोंदवला होता, असे तिने सांगितले.‘हरामखोर’मध्ये नवाजुद्दीनसोबत काम करण्याचा अनुभव कसा राहिला, याबद्दल विचारले असता श्वेता म्हणाली, नवाजुद्दीन यांच्यासोबत काम करण्याच्या विचाराने आधी माझ्या पोटात अक्षरश: गोळा आला होता. मी खूप नर्व्हस होते. पण शूटींग सुरु झाले आणि माझी भीती पळून गेली. कारण नवाजुद्दीन यांनी मला माझ्या नवखेपणाची जराही जाणीव होऊ दिली नाही. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे मी माझे भाग्य समजते.