Join us

"अच्छा तो नही लगता पर पैसे मिलते है २० रु ",राजकुमार रावचा ऑडीशनचा 'तो' व्हिडीओ पाहून चाहत्यांचेही पाणावले डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 18:44 IST

राजकुमार राव रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. म्हणूनच 2021 नवीन वर्ष राजकुमार रावच्याच नावावर असेल. राजकुमार रावने एक नाही दोन नाही तर एकाच वेळी तीन सिनेमे साइन केले आहेत.

स्ट्रगल काळ कुणालाच चुकला नाही... मग या हिरोलाही तो कसा चुकणार.... मात्र हिरो बनल्यानंतरही याच स्ट्रगल पिरीयडच्या आठवणी राजकुमार रावच्या मनात आजही ताज्याच आहेत. सुरुवातीच्या काळात कशाप्रकारे ऑडीशन देत स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत करायचा हेच दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने केलेला संघर्ष सांगताना तो दिसतोय. करिअरच्या सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल सहन करावा लागला.  आज जिद्द आणि मेहनतीने राजकुमार राव आघाडीचा अभिनेता बनला आहे. 

एकापाठोपाठ सतत हिट फिल्म देणार्‍या राजकुमारने रसिकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. त्याने आपल्या अभिनयाने सा-यांचीच मनं जिंकली आहेत. पुन्हा एकदा राजकुमार राव रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. म्हणूनच 2021 नवीन वर्ष राजकुमार रावच्याच नावावर असेल. राजकुमार रावने एक नाही दोन नाही तर एकाच वेळी तीन सिनेमे साइन केले आहेत.

'मन्नत'च्या बाहेर तासन तास उभा राहायचा राजकुमार राव

राजकुमारने सांगितले की, मी शाहरुख खानचा खूप मोठा फॅन आहे. मी पहिल्यांदा अकरावीत असताना मुंबईत आलो होतो तेव्हा मी 'मन्नत' (शाहरुख खानच्या घराबाहेर) च्या बाहेर अनेक तास उभा होतो. शाहरुखची एक तरी झलक मला पाहायला मिळावी अशी माझी इच्छा होती. अनेक तास उभे राहिल्यानंतर देखील मला शाहरुखला पाहायला न मिळाल्याने मला खूप वाईट वाटले होते. मी शाहरुख खानला सगळ्यात पहिल्यांदा चित्रीकरणाच्या निमित्ताने मेहबुब स्टुडिओत भेटलो.

 

मी त्याला भेटलो त्यावेळी त्याला माझ्याविषयी सगळे काही माहीत होते. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला होता. पण याच सगळ्या गोष्टी त्याला खास बनवतात असे मला वाटते. मी आज त्याला कधीही फोन, मेसेज करू शकतो. तो देखील मला अनेकवेळा फोन करतो. पण आजही मी त्याचा खूप मोठा फॅन असून त्याला भेटल्यावर, त्याच्याशी फोनवर बोलताना मला तितकाच आनंद होतो.

टॅग्स :राजकुमार राव