‘आलियासारखे चित्रपट मी देखील केलेत’-परिणीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 14:01 IST
आज आलिया भट्ट जवळ अनेक चित्रपट आहेत. सध्या ती ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चित्रपटासाठी काम करते आहे. तसेच तिच्या ‘उडता ...
‘आलियासारखे चित्रपट मी देखील केलेत’-परिणीती
आज आलिया भट्ट जवळ अनेक चित्रपट आहेत. सध्या ती ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चित्रपटासाठी काम करते आहे. तसेच तिच्या ‘उडता पंजाब’,‘ हायवे’ चित्रपटातील परफॉर्मन्सेससाठी कौतुक केले जात आहे. पण, याबाबतीत परिणीती चोपडाला वाटतेय की, तिचे करिअरही फार काही कमी यशस्वी नाहीये.ती म्हणते,‘ मी देखील बरेच चित्रपट साकारले आहेत. माझ्या करिअरच्या सुरूवातीलाच मी असे चित्रपट केले आहेत. मी ईशकजादे केला आणि त्यासाठी मला नॅशनल अॅवॉर्डही मिळाला आहे.तिने केलेले ‘स्टुडंट आॅफ द ईयर’,‘ कपूर अॅण्ड सन्स’ चित्रपट मी आता करते आहे.’ परिणीतीला तिच्यासोबतच्या अभिनेत्रींसोबत तुलना केल्यावर देखील काही वाटत नाही. तिला त्यामुळे आणखी काम करण्याची उमेद आणि शक्ती मिळते.