प्रसिद्धी,पैशांची मला हाव नाही - अनुष्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 11:07 IST
‘सुल्तान’ चित्रपटात पहेलवानाची भूमिका केलेली अनुष्का शर्मा सध्या खुप खुश आहे. तिची भूमिका प्रेक्षकांना कशी वाटते याकडे तिचे लक्ष ...
प्रसिद्धी,पैशांची मला हाव नाही - अनुष्का
‘सुल्तान’ चित्रपटात पहेलवानाची भूमिका केलेली अनुष्का शर्मा सध्या खुप खुश आहे. तिची भूमिका प्रेक्षकांना कशी वाटते याकडे तिचे लक्ष लागून राहिले आहे. तिने तिच्या या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. पहेलवानाच्या शरीरयष्टीसाठी तिने स्पेशल डाएट फॉलो केले होते.याबद्दल बोलताना ती म्हणते,‘ मी केवळ प्रोटीन डाएटवर होते. मी गेल्या दोन वर्षांपासून शाकाहारी बनले आहे. मी कित्येक दिवसांपासून पनीर, हिरव्या पालेभाज्या आणि स्पिरूलिनाच्या टॅबलेट्स घेत आहे. माझ्यासाठी प्रेक्षकांची कौतुकाची थाप महत्त्वाची आहे. त्यामुळे मी कितीही कष्ट घ्यायला तयार असते.मी कुठल्याही प्रसिद्धी आणि पैशांची हाव न ठेऊन बॉलीवूड या क्षेत्राकडे वळले आहे. मला चांगले चित्रपट पहिल्यापासून मिळत गेले. आदित्य चोप्राचे मी आभार मानू इच्छिते. त्याने माझ्यावर खुप विश्वास ठेवला. प्रचलित भूमिकांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला.’