पती-पत्नी ‘फिटनेस फ्रिक’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 11:10 IST
बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे दोघे पती-पत्नी किती फिटनेस फ्रिक आहेत हे काही सांगायला हवे का? नाही ना? ...
पती-पत्नी ‘फिटनेस फ्रिक’!
बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे दोघे पती-पत्नी किती फिटनेस फ्रिक आहेत हे काही सांगायला हवे का? नाही ना? काही महिन्यांपूर्वीच ते लग्नाच्या बेडीत अडकले. आणि आता ते जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवण्याचा प्रयत्न करतात.नुकतेच ते बाली येथे व्हॅकेशन्सवर गेले होते. तिथेही त्यांनी त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी घेतली. त्यांनी सोशल मीडियावर योगा, प्राणायाम करतानाचे फोटो अपलोड केले होते. तिथून परतल्यानंतर त्यांनी त्यांचे शेड्यूल पूर्ववत केले आहे.नुकताच त्यांनी त्यांचा जीममध्ये सराव करतांनाचा फोटो पोस्ट केला आहे. त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ मॅन: व्हॉट वर्कआऊट आर यू गॉना बी डुर्इंग टूडे माय लेडी? वुमन: द वन व्हेअर आय पुट धीस बँण्ड अराऊंड युअर नेक अॅण्ड हँग फ्रॉम इट, माय लॉर्ड!’