Join us

आता कधीच बिर्याणी खाणार नाही...! हुमा कुरेशीचा कानाला खडा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 06:00 IST

जीभेचे चोचले किती महागात पडतात, हाही धडा तिने शिकलाय. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे.

ठळक मुद्देहुमा तिच्या वाढत्या वजनामुळे कायम टीकेची धनी ठरत आलीय. पण हुमाने कधीच या टीकेकडे लक्ष दिले नाही.

‘गँग आॅफ वासेपूर 2’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या जिममध्ये घाम गाळतेय. जिममधील हुमाचे ट्रेनिंग इतके टफ आहे की, ते करताना हुमाची प्रचंड दमछाक होतेय. पण बॉलिवूडमध्ये टिकून राहायचे म्हटल्यावर या ट्रेनिंगला पर्याय नाही, हे हुमाला चांगलेच कळून चुकलेय  शिवाय जीभेचे चोचले किती महागात पडतात, हाही धडा तिने शिकलाय. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. जिममध्ये टफ ट्रेनिंग करताना हुमाला अगदी ‘देव’ आठवला अन् त्यामुळे आता मी कधीच बिर्याणी खाणार नाही, हे तिने ठरवून टाकले. होय, हुमाने जिममधला वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओचे कॅप्शन सध्या चांगलेच चर्चेत आहे. ‘आज मी जे काही केले, ते आयुष्यात कधीच केले नव्हते. मी असे करण्याची कल्पनाही करू शकत नव्हती. व्हिडीओच्या अखेरिस माझ्या वेदनेचे अनमोल भाव तुम्ही पाहू शकतात. मी आता कधीच बिर्याणी खाणार नाही...,’असे हुमाने लिहिले आहे.

एकंदर काय तर, जिममध्ये इतके टफ वर्कआऊट करण्यापेक्षा जिभेवर ताबा राखलेला बरा, हे उशीरा का होईला हुमाला कळून चुकलेय. आता फक्त तिचा जिभेवरचा ताबा कुठपर्यंत टिकतो, ते बघायचेय.

हुमा तिच्या वाढत्या वजनामुळे कायम टीकेची धनी ठरत आलीय. पण हुमाने कधीच या टीकेकडे लक्ष दिले नाही. पण काळासोबत बदल गरजेचा असतो. विशेषत: ग्लॅमर इंडस्ट्रीत टिकायचे तर हा बदल अतिआवश्यक ठरतो. हुमाने आत्तापर्यंत एक थी डायन,लव शव ते चिकन खुराना,बदलापूर2, आणि जॉली एलएलबी2 अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. 

टॅग्स :हुमा कुरेशी