Join us

'सीता' भूमिकेत झळकली तर याद राख, करिना कपूरला देण्यात आली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 14:44 IST

सीता भूमिकेसाठी करिना कपूर पेक्षा इतरही अभिनेत्री या भूमिकेसाठी परफेक्ट असल्याचे बोलनाता दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या करिनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

बॉलिवूडची बेबो करिना कपूर सध्या सीता भूमिकेसाठी तिने मागितलेल्या मानधनामुळे चर्चेत आहे. ही भूमिका साकारण्यासाठी तिने  तब्बल 12 कोटी रुपयांची मागणी केली होती. यानंतर करिना कपूर प्रचंड चर्चेत आहे.बॉलिवूड निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक अलौकिक देसाई यांनी सिनेमासाठी करिनाची भेट घेतली होती. करिना एका सिनेमासाठी ६ ते ८ कोटी इतके मानधन घेते. मात्र 'सीता' सिनेमासाठी तिने दुप्पट मानधन मागितले आहे. या सिनेमासाठी करिनाला १० ते १२ महिने काम करावं लागणार आहे.करिनाला तिचा संपूर्ण वेळ तिला याच सिनेमासाठी द्यावा लागणार आहे. करिनाने मागितलेल्या माधनामुळे सध्या निर्मातेही यावर विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. केवळ मानधनामुळे करिना व्यतिरिक्त दुस-याही अभिनेत्रीचा विचार केला जाण्याचीही शक्यता आहे.

दरम्यान नेटीझन्स सोशल मीडियावर सीता भूमिकेसाठी करिना कपूरपेक्षा दुस-या अभिनेत्रींची नावं सुचवताना दिसतायेत. सीता भूमिकेसाठी करिना कपूर पेक्षा इतरही अभिनेत्री या भूमिकेसाठी परफेक्ट असल्याचे बोलनाता दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या करिनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर बॉयकॉट करिना कपूर खान ट्रेंड होत आहे. इतकंच काय तर करिनाने ही भूमिका साकारु नये सिनेमा प्रदर्शित होऊच देणार नसल्याचा इशाराच बजरंग दलानं दिला आहे.

करिना कपूर जर या सिनेमात झळकली तर सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे बजरंग दलानं म्हटलं आहे. बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्यानी मीडियाशी बोलताना सांगितले की, बॉलिवूडमध्ये हिंदू धर्मावर सिनेमा बनवले जातात. यात मुख्य भूमिका मुस्लिम कलाकारांना दिली जाते. हिंदू धर्मांवर बनलेल्या सिनेमातून कलाकार गलेलठ्ठ कमाई करतात.

नंतर आपल्याच संस्कृतीवर टीका करताना दिसतात. हिंदू धार्मियांच्या भावना दुखावण्याचे काम यापूर्वी करिना आणि सैफअली खानने केले आहे. त्यामुळे सीता अशा पवित्र भूमिकेसाठी करिना कपूर खान योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमच्या इशा-यानंतरही करिना कपूरसोबत हा सिनेमा बनवला गेला तर नक्कीच त्याचा विरोध केला जाईल.यासंबधी निवेदनही त्यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहे. 

टॅग्स :करिना कपूर