हृतिकचे Twitter अकाऊंट ‘हॅक’??
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 17:29 IST
हृतिक रोशन व कंगना रानोट यांच्यातील वाद आठवतो ना! हृतिकचे पर्सनल मेल अकाऊंट म्हणजे हॅक झाले होते आणि त्यावरून ...
हृतिकचे Twitter अकाऊंट ‘हॅक’??
हृतिक रोशन व कंगना रानोट यांच्यातील वाद आठवतो ना! हृतिकचे पर्सनल मेल अकाऊंट म्हणजे हॅक झाले होते आणि त्यावरून कुणीतरी हृतिकच्या नावाने कंगनाशी बोलत होते, असा हृतिकचा दावा होता. कंगनाने मात्र हा दावा फोल असून हृतिक खोटा बोलत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणावरून हृतिक व कंगना दोघांनीही परस्परांना कायदेशीर नोटीसही बजावले होते. एवढेच नाही तर याप्रकरणी हृतिकने सायबर सेलकडे तक्रारही नोंदवली होती. आता हे कमी की काय, तर हृतिकचे Twitter अकाऊंट म्हणे हॅक झालेय. Twitter अकाऊंटवर काही बदल झाल्याचे अचानक हृतिकच्या लक्षात आले. साहजिक हे बदल त्याने केलेले नाहीत. त्यामुळे तो काळजीत पडला. यानंतर त्याने लगेच त्याच्या मायक्रोब्लॉगिंग पेजवर एक मॅसेजही लिहिला. “Hey. my handle has automatically unfollowed som random accounts! does this happen?#twitterghost #hack? What’s up Twitter?” असे हृतिकने लिहिले आहे. आता याप्रकरणी हृतिक पुन्हा तक्रार दाखल करतो का, ते पाहूयात!!