Join us

​हृतिकच्या चिमुकल्या फॅन्सला मिळणार अनोखी भेट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 22:13 IST

बच्चे कंपनीमध्ये सगळ्यात लोकप्रीय बॉलिवूड स्टार कुठला तर तो हृतिक रोशन हाच आहे. ‘कोई मिल गया’,‘क्रिश’ या चित्रपटांतील हृतिक ...

बच्चे कंपनीमध्ये सगळ्यात लोकप्रीय बॉलिवूड स्टार कुठला तर तो हृतिक रोशन हाच आहे. ‘कोई मिल गया’,‘क्रिश’ या चित्रपटांतील हृतिक बच्चेकंपनीला चांगलाच भावला. ‘क्रिश’ने तर बच्चेकंपनीला अगदी वेड लावले. त्यामुळे इतर बॉलिवूड कलाकारांच्या तुलनेत हृतिक बच्चेकंपनीमध्ये चांगलाच लोकप्रीय झाला. त्याची ही लोकप्रीयता एका खेळणी बनवणाºया कंपनीनेही हेरली. त्याचमुळे ‘क्रिश’, ‘धूम’, ‘बँग-बँग’, ‘जोधा अकबर’, ‘कोई मिल गया’ आणि ‘कहो ना प्यार है’ या  अनेक चित्रपटांत हृतिकने साकारलेल्या व्यक्तिरेखा खेळण्यांच्या रूपात आणण्याचा निर्णय या कंपनीने घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हृतिकच्या निवडक चित्रपटांचे कॅरेक्टर खेळण्यांच्या रूपात बाजारात आणली जाणार आहेत. यासाठी संबंधित चित्रपटांच्या निर्मात्यांची परवानगी आवश्यक आहे.अर्थात निर्मात्यांकडून ही परवानगी नाकारण्याचे काहीही कारण नाही. असे झालेच तर मग हृतिकच्या  व्यक्तिरेखांमधील ही खेळणी तुमच्या आमच्या घरी आलीच म्हणून समजा!