Join us

​हृतिक-सोनम नाही आलिया-सिद्धार्थ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 10:57 IST

हृतिक-सोनम नाही आलिया-सिद्धार्थ!!होय, हृतिक-सोनम नाही तर आलिया-सिद्धार्थ. आता ही काय भानगड म्हणून तुम्ही विचाराल. तर ताजी खबर म्हणजे, ...

हृतिक-सोनम नाही आलिया-सिद्धार्थ!!होय, हृतिक-सोनम नाही तर आलिया-सिद्धार्थ. आता ही काय भानगड म्हणून तुम्ही विचाराल. तर ताजी खबर म्हणजे, ‘आशिकी 3’ मध्ये हृतिक-सोनम नाही तर आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे ‘कपल’ दिसण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक व निर्माते महेश भट्ट यांच्या बॅनरखाली ‘आशिकी 3’ची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मोहित सूरी हाच या चित्रपटाचा दिग्दर्शक असणार आहे.‘आशिकी 3’साठी आलिया व सिद्धार्थ परफेक्ट असल्याचे  महेश भट्ट आणि मोहित सूरी यांचे मत आहे. खुद्द महेश भट्ट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या चित्रपटासाठी आलिया व सिद्धार्थला विचारणा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात अद्याप या दोघांनी चित्रपट अद्याप साईन केलेला नाही.  ‘आशिकी 2’ मध्ये आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे जोडी दिसली होती. या चित्रपटाला अपार यश मिळाले होते. त्यामुळे  ‘आशिकी 3’मध्ये नवी जोडी घेऊन  ‘आशिकी 2’प्रमाणेच यश मिळवण्याचा दिग्दर्शकाचे प्रयत्न आहेत. असे झाल्यास  ‘आशिकी 3’ हा आलियाचा तिच्या वडीलांच्या बॅनरखाली केलेला पहिला चित्रपट असेल.