Join us

हृतिक रोशन म्हणतो,‘अंधांच्या जगाबद्दल आपण आहोत ‘ब्लार्इंड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 18:35 IST

हृतिक रोशन आणि यामी गौतम ही जोडी सध्या ‘काबिल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित आणि राकेश रोशन निर्मित ...

हृतिक रोशन आणि यामी गौतम ही जोडी सध्या ‘काबिल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित आणि राकेश रोशन निर्मित या चित्रपटात त्यांनी अंध व्यक्तींची भूमिका साकारली आहे. अंधांचे जीवन, कार्य, समाजातील त्यांचं स्थान यावर चित्रपटात प्रकाश टाकलाय.  चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शनचे काम पूर्ण झाले असून आता प्रमोशनचा शेवटचा टप्पा बाकी राहिला आहे.यामी आणि हृतिक हे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहेत. दिल्लीत अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत बोलतांना हृतिकने अंध व्यक्तींच्या आयुष्याबद्दल खंत व्यक्त केली. तो म्हणाला,‘अंध व्यक्तींचे आपल्या समाजासाठी खुप महत्त्वाचे योगदान आहे. त्यांचंही आयुष्य आपल्यासारखंच असतं हे आपल्याला लक्षात येत नाही. अंध व्यक्ती आजपर्यंत उपेक्षितच आहेत. आपण त्यांच्या जगासाठी खरंतर अंध आहोत. अंध व्यक्ती समाजात अनेक उच्च पदांवर काम करत आहेत. त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या जगण्याला आमचा सलाम.’‘काबिल’ मुळे शिकण्याची जिद्द निर्माण झाली. पुढे त्यांच्याविषयी बोलताना हृतिक म्हणतो,‘ काबिल साठी शूटिंग करण्याअगोदर मी काही अंध व्यक्तींना भेटलो होतो. त्यांच्यापासून मी प्रेरणा घेतली. त्यांची आयुष्य जगण्याची जिद्द ही खरंच शिकण्यासारखी आहे. आत्तापर्यंत समाजात ते नेहमीच दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांच्यासाठी काही करता आलं तर नक्कीच मी पुढे होईन.’Also Read :* Kaabil Making: अंध बनून हृतिक रोशनने कसे केले ‘काबील’मधील स्टंट