बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता ऋतिक रोशन हा सर्वोत्तम डान्सर्सपैकी एक आहे, याबाबत कोणतीही शंका नाही. त्याला नृत्याची आवड लहानपणापासूनच होती. जो त्याच्या अचूक डान्स मुव्ह्जसाठी ओळखला जातो. अशातच हृतिक रोशनचा एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. जैसलमेरमधील एका लग्नसमारंभात हृतिकने आपल्याच सुपरहिट गाण्यावर असा काही डान्स केला की, उपस्थितांच्या नजरा त्याच्यावरून हटत नव्हत्या.
ऑनलाइन व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हृतिक त्याच्या डेब्यू चित्रपट 'कहो ना प्यार है'च्या टायटल ट्रॅकवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हृतिकने जेव्हा या गाण्याची आयकॉनिक हुकस्टेप केली, तेव्हा लग्नातील वऱ्हाडीही त्याच्यासोबत ताल धरू लागले. हृतिकचा तोच उत्साह पाहून चाहत्यांना २६ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. हृतिकचे वय सध्या ५२ वर्षे आहे, मात्र या व्हिडीओमध्ये त्याचा फिटनेस पाहून तो २५ वर्षांचा तरुण वाटत असल्याची प्रतिक्रिया अनेक युझर्सनी दिली आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं हृतिक रोशनचा शेवटचा चित्रपट 'वॉर २' बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नाही आणि त्याला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले. मात्र, आता हा सुपरस्टार जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. हृतिकच्या 'क्रिश ४'ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Web Summary : Hrithik Roshan, known for his dance skills, recently captivated wedding guests by performing his hit song 'Kaho Naa Pyaar Hai'. Fans were thrilled, reminiscing about the iconic moves and his youthful energy. He is preparing for a strong comeback with 'Krrish 4'.
Web Summary : ऋतिक रोशन ने एक शादी में 'कहो ना प्यार है' गाने पर डांस कर सबको चौंका दिया। उनके डांस मूव्स और ऊर्जा ने प्रशंसकों को 26 साल पुरानी यादें ताजा करा दीं। ऋतिक अब 'क्रिश 4' से वापसी करने वाले हैं।