Join us
Daily Top 2Weekly Top 5

ह्रतिक रोशन म्हणाला- क्या बात है!, प्रियांका चोप्राच्या 'या' फोटोवर सेलिब्रिटी करतायेत एकापेक्षा एक कमेंट्स....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 13:18 IST

प्रियंकाचे फॅन्स आणि बॉलिवूड सेलेब्स या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स करतायेत.

प्रियंका चोप्राने कॅज्युअल डेनिम लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. जे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. प्रियंकाचे फॅन्स आणि बॉलिवूड सेलेब्स या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स करतायेत. व्हाइट टॉप आणि ब्लू डेनिम जीन्समधले फोटोशूट प्रियंकाने सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

'क्या बात है' अशी कमेंट अभिनेता ह्रतिक रोशनने केली आहे. तर राजकुमार रावने हार्टचे इमोजी पोस्ट केले आहेत. फराह खान अलीने 'गॉर्जिअस' अशी कमेंट पीसीच्या फोटोवर केली आहे. अनुष्का दांडेकरने प्रियंकाला 'ब्युटीफुल' म्हटलं आहे.  

'अनफिन‍िश्ड' हे प्रियंका चोप्राचे पुस्तक पुढील वर्षी रिलीज होणार आहे. या पुस्तकात, ती तिच्या आयुष्याबद्दल अनेक महत्त्वपूर्ण खुलासे करू शकते. . निक जोनस प्रियंका चोप्राचा आगामी हॉलिवूड रोमँटिक ड्रामा टेक्स्ट फॉर यूमध्ये केमिओ करताना दिसणार आहे.जिम स्ट्रॉसे लिखित, दिग्दर्शित हा चित्रपट सोफी क्रमरच्या कादंबरीवर आधारीत जर्मन भाषेतील चित्रपट 'एसएमएस फर डिच'चा इंग्रजी रिमेक आहे.

या चित्रपटात सैम हेघनदेखील आहे. निक आणि प्रियंकाची जोडीला म्युझिक व्हिडीओनंतर रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशात हा चित्रपट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रा