हृतिकच्या आईचे वडील अन् हृतिकचे आजोबा ओम प्रकाश यांनी १९७४ मध्ये ‘आप की कसम’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटानेच त्यांना ओळख मिळवून दिली. कारण हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीसाठी खूप मोठे यश ठरला.
दरम्यान, हृतिकने आजोबांच्या वाढदिवसाचे काही फोटोज् शेअर करताना त्यांच्याविषयी भावनाही व्यक्त केल्या. हृतिकने लिहिले की, एकेकाळी त्यांनी पुस्तके खरेदी करण्यासाठी लग्नाची अंगठी विकली होती. स्ट्रीट लाइट्सच्या खाली बसून त्यांनी अभ्यास केला. पुढे इंडस्ट्रीपर्यंत प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना केला. ‘आप की कसम’सह त्यांनी २२ चित्रपटांची निर्मिती केली. आज ते ९२ वर्षाचे झाले आहेत.