Join us
Daily Top 2Weekly Top 5

​हृतिक रोशन व सोनम दिसणार सोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 14:12 IST

पहिल्यांदाच एखाद्या अभिनेता व अभिनेत्री यांची जोडी हिट होणे हे फारच कमी वेळा घडते. यामध्ये हृतिक रोशन व सोनम ...

पहिल्यांदाच एखाद्या अभिनेता व अभिनेत्री यांची जोडी हिट होणे हे फारच कमी वेळा घडते. यामध्ये हृतिक रोशन व सोनम कपूर यांचा समावेश आहे. या दोघांनी ‘धीरे धीर से ’या गाण्यामुळे पे्क्षकांचे मन जिंकून घेतले होते. हा एक म्युझिक व्हिडीओ होता. यामध्ये हृतिक व सोनम ही रोमांटिक जोडी बघीतल्यानंतर प्रेक्षक त्यांना चित्रपटात सोबत काम करण्याची मागणी करायला लागले.आतापर्यंत या दोघांनेही सोबत एकाही चित्रपटात काम केले नाही. परंतु, दोघेही  लवकरच पडद्यावर सोबत दिसणार आहेत. मात्र, ते चित्रपट नसून, टीव्ही जाहीरातीत दिसणार आहेत. या दोघांनेही त्याची शुटींग पूर्ण केली आहे. याअगोदर एका मोबाईलच्या जाहीरातीत हे दोघे सोबत दिसले होते.  हृतिकचा लवकरच ‘मोहेंजोदडो’ हा चित्रपट रिलीज होत आहे. त्यामध्ये तो नवी अभिनेत्री पूजा हेगडेसोबत रोमांस करताना दिसणार आहे. तर सोनम ही रिया कपूरच्या ‘ वीरे दी वेडिंग’ या चित्रपटासाठी शुटींग सुरु करणार आहे.