प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांचा 'वॉर २' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता लवकरच ओटीटीवर येणार आहे. चित्रपटाचे ओटीटी स्ट्रीमिंग हक्क नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. 'वॉर २' या चित्रपटात हृतिक आणि ज्यु. एनटीआर हे प्रमुख भूमिकेत होते. तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतका चालला नाही. आता 'वॉर २' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शन होण्यास सज्ज आहे. याविषयीची अपडेट समोर आली आहे.
कधी रिलीज होणार 'वॉर २'?
'वॉर २'च्या निर्मात्यांनी अधिकृत ओटीटी रिलीज डेट जाहीर केली नसली, तरीही मीडिया रिपोर्टनुसार चित्रपट थिएटरमध्ये इतका चालला नाही तर प्रदर्शित झाल्यानंतर ६ ते ८ आठवड्यांनी ओटीटीवर येतो. 'वॉर २' चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असल्याने, हा चित्रपट २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना थिएटरमध्ये 'वॉर २' पाहता आला नाही त्यांना आता सहकुटुंब - सहपरिवार हा सिनेमा घरबसल्या बघता येईल.
'वॉर २' या चित्रपटात हृतिक रोशन, ज्युनियर एनटीआर, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट YRF स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संमिश्र यश मिळवले आहे. त्यामुळे आता प्रेक्षक हा चित्रपट ओटीटीवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 'वॉर २' चित्रपटाच्या शेवटी स्पाय युनिव्हर्सचा पुढील चित्रपट 'अल्फा'ची सुद्धा घोषणा झाली आहे. 'अल्फा'मध्ये अभिनेता बॉबी देओल खलनायक म्हणून झळकणार आहे.