Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोशनल इव्हेंट अर्ध्यावर सोडून पळाला हृतिक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 17:23 IST

‘मोहेंजोदडो’च्या  प्रमोशनसाठी  हृतिक रोशन वेळ तर देतोय, पण कदाचित मनापासून नाही. उद्या शुक्रवारी  ‘मोहेंजोदडो’ प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तत्पूर्वी ...

‘मोहेंजोदडो’च्या  प्रमोशनसाठी  हृतिक रोशन वेळ तर देतोय, पण कदाचित मनापासून नाही. उद्या शुक्रवारी  ‘मोहेंजोदडो’ प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तत्पूर्वी गुरुवारी  मुंबईतील एका सिनेमागृहात चाहत्यांसाठी ‘मोहेंजोदडो’चा प्रमोशन इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. इव्हेंटच्या सुरुवातीला हृतिक अतिशय चांगल्या मूडमध्ये होता. यावेळी बोलताना त्याने को-स्टार पूजा हेगडेची जोरदार प्रशंसा केली. यापूर्वी मी कधीही इतक्या चांगल्या को-स्टारशी काम केलेले नाही, इथपर्यंत तो बोलून गेला. मात्र अचानक काय झाले कुणास ठाऊक?? हृतिकचे मूड अचानक बिघडले. इतके की त्याने लगेच इव्हेंटमधून काढता पाय घेतला. यावेळी हृतिकच्या चेहºयावरचा संताप स्पष्ट दिसत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पटकथा लेखक अक्षयादित्य लामा या इव्हेंट स्थळी पोहोचणार असल्याची खबर हृतिकला मिळाली होती. त्याचमुळे कुठलाही गोंधळ होण्याआधीच तिथून निघून जाणे हृतिकने योग्य समजले. लामा यांनी ‘मोहेंजोदडो’चा विरोध चालवला आहे. माझी कथा चोरून  ‘मोहेंजोदडो’ बनवण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.