‘रँम्बो’ च्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 23:37 IST
सिल्व्हेस्टर स्टॅलोन्सचा ‘रॅम्बो’ हा हॉलीवूड चित्रपटातील एक आदर्श हिरो आहे. त्याचे चित्रपट जगाच्या पाठीवर कोणीही अत्यंत आवडीने पाहू शकतो. ...
‘रँम्बो’ च्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक?
सिल्व्हेस्टर स्टॅलोन्सचा ‘रॅम्बो’ हा हॉलीवूड चित्रपटातील एक आदर्श हिरो आहे. त्याचे चित्रपट जगाच्या पाठीवर कोणीही अत्यंत आवडीने पाहू शकतो. निर्माता सिद्धार्थ आनंद आता म्हणे त्याचा ‘रॅम्बो’ हा चित्रपट हिंदीत बनवणार आहे. त्याने ‘रॅम्बो’ चे अधिकार नुकतेच विकत घेतले आहेत.त्याचा याअगोदरचा ‘बँग बँग’ हा हृतिक रोशन आणि कॅटरिना कैफ चित्रीत चित्रपट हॉलीवूडपट ‘नाईट अॅण्ड डे’ चा रिमेक होता. यातही हृतिक मुख्य भूमिकेत असणार आहे. या भूमिकेला एक देसी टिवस्ट देण्यात येणार आहे. दरम्यान, अक्षय कुमार देखील या रिमेकमध्ये काम करण्यासाठी उत्सुक होता.