Join us

जॅकलिन कशी बनली चुलबुली गर्ल... कॉफी विथ करणमध्ये केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 15:17 IST

करण जोहरच्या कॉफि विथ करण या टॉक शोमध्ये या आठवड्यात जॅकलिन फर्नांडिस आणि सिद्धार्थ मल्होत्रा हजेरी लावताना दिसणार आहेत. ...

करण जोहरच्या कॉफि विथ करण या टॉक शोमध्ये या आठवड्यात जॅकलिन फर्नांडिस आणि सिद्धार्थ मल्होत्रा हजेरी लावताना दिसणार आहेत. जॅकलिन आणि सिद्धार्थ दोघेही भिन्न स्वभावचे आहेत. जॅकलीन एकदम चुलबुली आहे तर सिद्धार्थचे व्यक्तिमत्त्व शांत आणि गंभीर आहे.      जॅकलिनला आपण कधीच दु:खी आणि उदास पाहिले नसल्याचे सांगितले. यावेळी करणने जॅकलिनसोबतचा त्याचा एक किस्सा शेअर केला जॅकलिन आणि करणने एकत्र एका रिअॅलिटी शो जज केला आहे. त्या शो दरम्यान जॅकलिन एकदा हसायला लागली की तिला थांबवण्यासाठी करण तिला चिमटा काढायचा. सिद्धार्थने ही या वेळी जॅकलिनला आपण नेहमीच आनंदी पाहिले आहे आणि तिच्या या सवयीमुळे आपण जेल्स फील करत असल्याचेही सिद्धार्थ कबुल केले.   आपल्या सतत आनंदी राहण्याच्या रहस्याबाबत जॅकलिनने या शोमध्ये खुलासा केला. बऱ्याच जणांना वाटे मी लोकांना दाखवण्यासाठी आनंदी राहते पण तसे नाही आहे. स्वत:ला साकारात्मक ठेवणे कठीण आहे हे मी जाणते. माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली आहे तुम्ही तुमच्या चुका दुसऱ्यांवर टाकू शकत नाही त्यामुळे मी स्वता:ला अशा पद्धतीने तयार केला आहे की कोणत्याही परिस्थिती मी आनंदी आणि साकारात्मक विचार करते.  सिद्धार्थ म्हणाला मी जॅकलिनच्या एकदम विरुद्ध आहे. मला थोड्यावेळा लागतो लोकांमध्ये मिक्स व्हायला.  मी फक्त माझ्या जवळच्या व्यक्तींसोबत मी खूप गप्प मारतो, धमाल करतो, पार्टी करतो. त्यांच्याबरोबरच मी कम्फर्टेबल फील करतो. यावर जॅकलीन म्हणाली मला सिद्धार्थसारखे अभिनेता खूप आकर्षक वाटतो.