Join us

पूजाला कसा मिळाला ‘मोहेंजोदडो’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 17:22 IST

गोड चेहºयाची पूजा हेगडे ‘मोहेंजोदडो’मधून बॉलिवूड डेब्यू करते आहे. पहिल्याच बॉलिवूडपटात पूजाला हृतिक रोशनसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ...

गोड चेहºयाची पूजा हेगडे ‘मोहेंजोदडो’मधून बॉलिवूड डेब्यू करते आहे. पहिल्याच बॉलिवूडपटात पूजाला हृतिक रोशनसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे पूजा  जाम खूश आहे. पण तुम्हाला माहितीयं, या चित्रपटासाठी पूजाची निवड कशी झाली ते?? कदाचित नाही. ‘मोहेंजोदडो’चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी पूजाला या चित्रपटात कशी संधी मिळाली, ते सांगितलेय. या चित्रपटातील चानीच्या भूमिकेसाठी आशुतोष यांना एक नवा चेहरा हवा होता. असा चेहरा जो चानीसारखा दिसेल. करारी,आत्मविश्वास व तेजाने भरलेला आणि तरीही निष्पाप असा चेहरा आशुतोष यांना हवा होता. आशुतोष अशा चेहºयाच्या शोधात होते. याचदरम्यान आशुतोषची पत्नी सुनिता यांना रणबीर कपूरसोबतच्या एका कारच्या जाहिरातीत पूजा दिसली. हीच चानी असे सुनीता यांना वाटले. आशुतोष यांनाही सुनीतांची निवड आवडली. तिच्यातील स्क्रीन प्रेझेन्स त्यांना आवडला आणि आशुतोष यांना ‘मोहेंजोदडो’साठी हिरोईन मिळाली. आशुतोष यांनी लगेच पूजाला बोलवले. आॅडिशन्स झाली आणि पूजाने हा चित्रपट साईन केला. एकंदर काय तर, बायकोची निवड आशुतोष यांना भावली, असेच म्हणावे लागेल..