भूमी पेडणेकर आणि आयुष्यमान खुराणा काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये सहभागी झाले होते. याठिकाणी भूमीला प्रश्न विचारण्यात आला की, जर तुला संधी मिळाली तर तू कोणाचा फोन नंबर ब्लॉक करू इच्छिणार? याचे उत्तर देताना भूमीने लगेचच वाणी कपूरचे नाव घेतले. जेव्हा नेहाने याचे कारण विचारले तर भूमीने सांगितले की, जर मी दुसºया कोणाचे नाव घेतले असते तर कदाचित अडचण आली असती, परंतु भूमी माझी चांगली मैत्रीण आहे, ती मला समजूून घेईल.
या चॅट शोदरम्यान आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांनी त्यांच्या आयुष्याशी निगडित अनेक सिक्रेटचा बिनधास्तपणे खुलासा केला. या दोघांची आॅनस्क्रीन जोडी ‘दम लगा के हईशा’ आणि ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. भूमी सध्या अभिषेक चौबे यांच्या ‘सोन चिरैया’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर वाणी कपूरला सिद्धार्थ आनंदच्या आगामी चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले आहे. ज्यामध्ये ती हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफसोबत बघावयास मिळणार आहे.