‘धीरे धीरे से...’ या ब्लॉकबस्टर गाण्यानंतर चाहते हनीच्या वापसीची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. सध्या तो ‘राईज अॅण्ड शाईन’ या आपल्या नव्या अल्बमच्या तयारीत बिझी आहे.
ALSO READ : जाणून घ्या, ‘या’ सेलिब्रिटींना व्यसनांमुळे झाला मनस्ताप
हनी सिंह गेल्या गत काळात वादात सापडला होता. गत काळात सुमारे दीड वर्षे योयो बॉलिवूडमधून पुरता गायब झाला होता. यादरम्यान त्याच्याबद्दल नाही नाही त्या अफवांचे पीक आले होते. पण यानंतर एका मुलाखतीत याकाळात त्याच्यासोबत काय काय घडले, हे हनीने जगासोबत शेअर केले होते. बॉलिवूडमधून काही काळ मी गायब होतो. बायपोलर डिसआॅर्डरशी माझी झुंज सुरु होती. यादरम्यान मी चार डॉक्टर बदलले. औषधांचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नव्हता. मी अक्षरश: वेडा झालो होतो. ते १८ महिने माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण दिवस होते. मी रिहॅब सेंटरमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण मी नोएडातील माझ्या घरी होतो, असे हनीने या मुलाखतीत कबुल केले होते. बायपोलर डिआॅर्डरमध्ये रूग्णाचे मूड क्षणाक्षणाला बदलते. कधी पराकोटीचा आनंद तर कधी घोर निराशा, असे त्याचे मूड असते. याच आजारामुळे हनीसिंह मद्याच्या आहारी गेला. इतका की, त्याला हे व्यसन सोडवण्यासाठीही उपचार घ्यावे लागले होते.