Join us

​‘टायगर जिंदा है’मध्ये दिसणार हॉलिवूड स्टाईल अ‍ॅक्शन...हे आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 10:39 IST

सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपाट या वर्षांचा ब्लॉकबस्टर असेल, यात शंका नाही. होय, दिग्दर्शक अली अब्बास जफर ...

सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपाट या वर्षांचा ब्लॉकबस्टर असेल, यात शंका नाही. होय, दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ज्याप्रकारे   तयारी चालवली आहे, त्यावरून तरी असेच वाटतेय. या चित्रपटात सलमान कधी नव्हे अशा जबरदस्त अ‍ॅक्शन रूपात दिसणार आहे, हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे. आता यासंदर्भात एक नवी बातमी आम्ही तुम्हाला देणार आहोत. होय, अली अब्बास यांनी या अ‍ॅक्शन दृश्यांसाठी हॉलिवूड अ‍ॅक्शन डायरेक्टर टॉम स्ट्रुदर्स याच्याशी संपर्क साधला आहे. टॉमने ‘एक्स मेन’,‘दी डार्क नाईट’,‘इनसेप्शन’ अशा धमाकेदार चित्रपटांसाठी अ‍ॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले आहे. त्यामुळे साहजिकच टॉम असल्यानंतर ‘टायगर जिंदा है’ धमाकेदार होणारच, यात शंका नाहीयं.या चित्रपटासाठी सलमानने देखील जोरदार तयारी चालवली आहे. चित्रपटासाठी त्याने एक नाही, दोन नाही तर सतरा किलो वजन कमी केले आहे. ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट ‘एक था टायगर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वल आहे. ‘एक था टायगर’ कबीर खान यांनी दिग्दर्शित केला होता. पण ‘टायगर जिंदा है’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी ‘सुल्तान’फेम अली अब्बास जफर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.  ‘एक था टायगर’ सुपरहिट, ब्लॉकबस्टर राहिल्यानंतर या चित्रपटाच्या सीक्वलकडूनही लोकांना अनेक अपेक्षा आहेत. या अपेक्षेवर हा चित्रपट किती खरा उतरतो, ते लवकरच दिसेलच.सलमान व कॅटरिनासोबतच अभिनेते परेश रावल हेही या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यांची भूमिका प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज पॅकेज असणार आहे. एकंदर काय तर सलमान-कॅटची लोकप्रीय जोडी, परेश रावल यांच्या रूपातील सरप्राईज पॅकेज आणि टॉम स्ट्रुदर्स सारखा हॉलिवूडचा अ‍ॅक्शन डायरेक्टर म्हटल्यावर ‘टायगर जिंदा है’ गाजणारच...होय ना?