Join us

हॉलीवूड चित्रपटाची पीसी होणार निर्माती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 14:21 IST

अभिनयाच्या क्षेत्रात कमालीची उडी घेतल्यानंतर प्रियांका चोप्राने आता निर्मिती क्षेत्राकडे स्वत:ला वळवले आहे. तिने  काही प्रादेशिक भाषांतील चित्रपट बनवले ...

अभिनयाच्या क्षेत्रात कमालीची उडी घेतल्यानंतर प्रियांका चोप्राने आता निर्मिती क्षेत्राकडे स्वत:ला वळवले आहे. तिने  काही प्रादेशिक भाषांतील चित्रपट बनवले आहेत. आता हॉलीवूड चित्रपट काढण्याचा निर्णय तिने घेतला आहे. अद्याप  बाकी गोष्टींबद्दल गुप्तता पाळण्यात येत आहे. ती सध्या ‘क्वांटिको ’ च्या सीजन २ साठी यूएसएमध्ये शूटींग करत आहे.तिने प्रादेशिक चित्रपटांपासून करिअरला सुरूवात केली. सध्या भोजपुरी चित्रपटावर काम सुरू आहे. तर आगामी ‘एक ओंकार’ या पंजाबी चित्रपटाचे दिग्दर्शनही ती करते आहे. तसेच ती ‘बेवॉच’ चित्रपटातही दिसणार आहे.वेल, पीसी ही अभिनयाच्या क्षेत्रात पारंपारिक विचार करणाऱ्या  हिरोईनपेक्षा वेगळी आहे. केवळ अभिनयाबाबतीतच मर्यादीत न राहता चित्रपटसृष्टीच्या विविध भागांवर आपले नाव कोरण्याची जिद्द तिच्यात आहे.