Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘बाहुबली2’चा हिट फॉर्म्युला आता ‘साहो’ला सुद्धा लागू!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 15:51 IST

सुपरडुपर हिट ‘बाहुबली2’नंतर अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूरचा ‘साहो’ हा सिनेमा येत आहे. प्रभासच्या या सिनेमाकडे सगळ्यांचे डोळे लागले ...

सुपरडुपर हिट ‘बाहुबली2’नंतर अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूरचा ‘साहो’ हा सिनेमा येत आहे. प्रभासच्या या सिनेमाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहे.  ‘बाहुबली2’ने कमाईचे सगळे विक्रम मोडत प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवले होते. त्यामुळे ‘बाहुबली2’नंतर प्रभासचा हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर किती खरा उतरतो, यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.  प्रेक्षकांची हीच उत्सुकता पाहता, ‘साहो’च्या सेटवर एक नवा नियम लागू करण्यात आला आहे. होय, हा नियम काय तर सेटवर मोबाईल बंदीचा. होय, ‘साहो’चा कुठलाही सीन वा पिक्चर लीक होऊ नये, अशी मेकर्सची इच्छा आहे आणि याचमुळे सेटवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय युनिटच्या सगळ्या लोकांना सेटवर मोबाईल बॅन करण्यात आलाय.   सेटवरील कोणतीच माहिती, फोटो किंवा व्हिडिओ चुकूनही लीक होऊ नये, अशी तंबी सगळ्यांना देण्यात आली आहे. लोकांची उत्सुकता ताणून धरायची आणि सरतेशेवटी बॉक्सआॅफिसवर ती कॅश करायची, असे यामागचे लॉजिक आहे. ‘बाहुबली2’बद्दलही मेकर्सनी अशीच गुप्तता पाळली होती. शूटींगच्या काळात ‘बाहुबली2’च्या सेटला अगदी छावणीचे स्वरूप आले होते. हाच फॉर्म्युला आता ‘साहो’साठी वापरला जात आहे. ‘साहो’च्या चित्रीकरणासाठी वेगवेगळे स्पॉट निवडण्यात आले आहेत. या ठिकाणांबद्दलची माहितीसुद्धा शेवटपर्यंत गुलदस्त्यातच ठेवण्यात येणार आहे. चित्रपटाच्या सेटवर येणाºया वाहनांपासून ते सेटवरच्या लोकांच्या साहित्यापर्यंत सगळे काही काही सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.  ALSO READ: ​‘साहो’साठी प्रभासने घेतला एक ‘धोकादायक’ निर्णय! वाचा संपूर्ण बातमी!!सुजीथ दिग्दर्शित ‘साहो’पुढील वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची वर्णी लागली आहे. चित्रपटात ती डबलरोल साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात श्रद्धा प्रभासच्या तोडीला तोड असे अ‍ॅक्शन सीन्स करतानाही दिसणार आहे.   प्रभासचा हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीत तयार होत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश यासारख्या बॉलिवूड स्टार्सची वर्णी लागली आहे.