‘एक्स्पेंडेबल्स’चा हिंदी रिमेक ; सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगन, सनी देओल येणार एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 10:12 IST
९०च्या दशकात आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारे अॅक्शन स्टार्सनी मागील २५ वर्षांत आपले एक खास स्थान निर्माण केले आहेत. ...
‘एक्स्पेंडेबल्स’चा हिंदी रिमेक ; सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगन, सनी देओल येणार एकत्र?
९०च्या दशकात आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारे अॅक्शन स्टार्सनी मागील २५ वर्षांत आपले एक खास स्थान निर्माण केले आहेत. सलमान खान, अजय देवगन, अक्षय कुमार, सनी देओल यांना एकत्र पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळू शकते. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘एक्स्पेंडेबल्स’ या इंग्रजी चित्रपटाच्या हिंदी रिमेक हे स्टार एकत्र येऊ शकतात. सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगन, सनी देओल यांनी जवळपास एकाच दशकात बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे या काळात या कलावंतांनी अॅक्शन स्टार म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. या स्टार्सनी जोड्यांनी काम केले असले तरी देखील चौघेही कधीच एकत्र आले नाहीत. या स्टार्सचा आज बॉलिवूडमध्ये दबदबा आहे. सर्वांची वेगळी स्टाईल व त्याला अनुरूप असणारी मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे आता हे चारही सुपरस्टार चाहत्यांना एकाच चित्रपटात पहायला मिळू शकतात असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. २०१० साली प्रदर्शित झालेला हॉलिवूड चित्रपट ‘एक्स्पेंडेबल्स’चा रिमेक करण्याची तयारी सुरू झाली असून त्यात सलमान खान, अक्षय कुमार, सनी देओल आणि अजय देवगन भूमिका करू शकतात असे सांगण्यात येते. ‘एक्स्पेंडेबल्स’चे निर्माते एव्ही व यारिव लेर्नर यांनी बॉलिवूड चित्रपटांचे निर्माते निलेश सहास यांच्याशी या चित्रपटाच्या हिंदी रिमेकबाबत चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. हॉलिवूड चित्रपटांमध्ये जसे अॅक्शन होते, तशाच प्रकारे या चित्रपटातही अॅक्शन दृष्ये साकारली जातील. मात्र यात सर्वांत मोठी अडचण चौघांच्या तारखांची आहे. सलमान खान व अक्षय कुमार यांचा शेड्यूल फार व्यस्त असल्याचे सांगण्यात येते. मात्र यासाठी या सर्व कलावंतानी होकार दिला तर चाहत्यांसाठी मोठी पवर्णी ठरले.