Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल अभिनेत्री रिचा धिमानची आत्महत्या : पोलीस हवालदार संशयाच्या घेऱ्यात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 17:46 IST

हिमाचल प्रदेशातील अभिनेत्रींने रिचा धिमान हीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आल्याने खळबळ माजली आहे. २४ वर्षीय रिचा धर्मशाला ...

हिमाचल प्रदेशातील अभिनेत्रींने रिचा धिमान हीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आल्याने खळबळ माजली आहे. २४ वर्षीय रिचा धर्मशाला येथे एका भाड्याच्या घरी राहत्या होती. हिमाचली भाषेत तयार केल्या जाणाºया चित्रपटात ती अभिनय करीत होती. तिच्या आत्महत्येमागे एका पोलीस हवालदाराचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. टाईम्स आॅफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती सकाळी ११ वाजताच्या सुमारस मिळली. घटनस्थळी पोहचल्यावर पोलिसांना रिचा धिमानच्या घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनासा आले. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यावर रिचाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. या घटनेबद्दल माहिती देताना वरिष्ठ पोलिस अधीक्षक संजीव गांधी म्हणाले, रिचा धिमान हिच्या घरून आत्महत्ये पूर्वी लिहलेले पत्र आढळले असून त्यात एका पोलीस हवालदाराच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. याचा कारणामुळे रिचाने आत्महत्या केली असावी असा अंदाज लावला जात आहे. या प्रकरणाची आयपीसीच्या कलम ३०६ व ३४ अंतर्गत पोलिसांनी नोंद केली असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. रिचा धिमान हिने हिमाचली चित्रपटात व अल्बममध्ये काम केले आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सध्या रिचा एका अल्बममध्ये कामही करीत होती. सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या रिचाचे फेसबुकवर सुमारे ४० हजार फालोअर्स असल्याचे सांगण्यात येते. रिचाच्या फेसबुक अकाऊंट पाहून ती सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असल्याचे दिसते. तिच्या आत्महत्येमुळे हिमाचली चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ माजली आहे.