Join us

High Alert : ​भन्साळींना का वाटतेय इतकी भीती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 15:35 IST

संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा एक एपिक ड्रामा घेऊन येत आहेत, हे आपल्याला ठाऊक आहेच. ‘पद्मावती’ या त्यांच्या चित्रपटाचे ...

संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा एक एपिक ड्रामा घेऊन येत आहेत, हे आपल्याला ठाऊक आहेच. ‘पद्मावती’ या त्यांच्या चित्रपटाचे शूटींग सध्या जोरात सुरु आहे. पण यामुळेच भन्साळींचे टेन्शन सध्या वाढलेय. होय, मुंबईच्या फिल्मसिटी स्टुडिओमध्ये ‘पद्मावती’चा सेट उभारण्यात आला आहे. संपूर्ण सेट किल्लयात बदलला आहे. भन्साळी सध्या या सेटचे डोळ्यांत तेल घालून रक्षण करताहेत. त्यामुळे सेटच्या सुरक्षेत त्यांनी मोठी वाढ केली आहे. संपूर्ण सेटबाहेर अभूतपूर्व सुरक्षा ठेवण्यात आली आहे.याचे कारण? अहो, कारण काय असणार? शाहिद कपूर, दीपिका पादुकोण या दोघांचा ‘पद्मावती’तील लूक लीक होऊ नये, हे त्यामागचे कारण आहे. भन्साळींना या दोघांचाही लूक लपवून ठेवायचा आहे. यासाठी हा सगळा खटाटोप सुरु आहे. यासाठी चित्रपटाच्या क्रू मेंबर्सवरही बारीक नजर ठेवली जात आहे. त्यांच्या बॅग आणि अन्य सामानाची तपासणी करण्यात येत आहे. जेणेकरून कॅमेरा वा मोबाईल सेटवर पोहोचू नये. सेटवरच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भन्साळींनी सेटवर सुरक्षा वाढवली आहे. कॅमेरा वा कॅमेरा असलेला मोबाईल सेटवर नेण्याची परवानगी नाही. दीपिका व शाहिद या दोघांचाही चित्रपटातील लूक एकदम जबरदस्त असल्याचेही या सूत्राने सांगितले.दीपिका पादुकोण या चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका साकारते आहे तर शाहिद राजा रतन सिंह याच्या भूमिकेत दिसणार आहे.   राजपूत राजाच्या भूमिकेसाठी शाहिदने आपल्या लूकमध्ये बदल केले आहेत. हा चित्रपटाची पाश्वभूमी ऐतिहासिक असल्याने त्यात तलवारबाजी व लढाईचे दृश्ये असतील. यामुळेच अभिनेता शाहिद आपली भूमिका जिवंत वाटावी, यासाठी तलवारबाजीचे धडे घेत आहे. Related stories : ​It's amazing :पाहा, रणवीर सिंहचा ‘पद्मावती’ अवतार !!दीपिकासोबत का कम्फर्टेबल नाही शाहीद?