Join us  

Hera Pheri 3: आधी 'भूल भुलैया' आता 'हेरा फेरी'; अक्षयच्या हातून कार्तिकने अजून एक चित्रपट हिसकावला..?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 8:00 PM

Hera Pheri 3: कार्तिक आर्यन 'हेरा फेरी 3'मध्ये काम करणार असल्याची माहिती अभिनेते परेश रावल यांनी दिली आहे.

Kartik Aaryan in Hera Pheri 3: अक्षय कुमार (Akshay Kumar), सुनील शेट्टी (Sunil Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) स्टारर 'हेरा फेरी' चित्रपट 2000 मध्ये रिलीज झाला होता. तिन्ही कलाकारांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले, ज्यामुळे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. याच्या काही वर्षानंतर चित्रपटाचा दुसरा भाग आला आणि तोही सूपरहिट झाला. आता या सुपरहिट फ्रेंचायजीचा तिसरा भाग येणार आहे. पण, यावेळी चित्रपटात एका नव्या कलाकाराची एन्ट्री होणार आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन या सुपरहिट कॉमेडी फ्रेंचायजीमध्ये सामील होणार आहे. स्वतः बाबुभय्या म्हणजेच अभिनेते परेश रावल यांनी याबाबत पुष्टी केली आहे. दरम्यान, चित्रपटात कार्तिक अक्षय कुमारची जागा घेणार असल्याच्या बातम्या येत आहेत. विशेष म्हणजे, कार्तिकने अक्षयचा सुपरहिट चित्रपट 'भूल भुलैया'च्या दुसऱ्या भागात काम केले आहे. या बातमीमुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे. अनेकजण सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त करत असून, अक्षयला परत आणण्याची मागणी करत आहेत.

'हेरा फेरी 3'मध्ये कार्तिक आर्यनची एन्ट्री

सोशल मीडियावर एका चाहत्याने परेश रावल यांना टॅग करुन विचारले की, 'कार्तिक आर्यन 'हेरा फेरी 3' मध्ये दिसणार आहे का?' यावर परेश रावल यांनी, 'होय हे खरे आहे,' असे उत्तर दिले. विशेष म्हणजे, या वर्षाच्या सुरुवातीला निर्माते फिरोज नाडियादवाला यांनी 'हेरा फेरी 3' आधीच्या दोन भागांप्रमाणेच करायचा असल्याचे म्हटले होते.

या चित्रपटात अक्षय कुमारच्या जागी कार्तिक दिसू शकतो. कारण, अलीकडील पिंकविलाच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, अक्षय  हेरा फेरी 3 च्या स्क्रिप्टवर फारसा खूश नाही. त्यामुळे तो या चित्रपटाचा भाग होणार नाही.  आता खरचं अक्षयची जागा कार्तिक घेणार की अक्षयसोबत कार्तिक काम करणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

टॅग्स :अक्षय कुमारकार्तिक आर्यनपरेश रावलसुनील शेट्टी