दिव्या भारतीप्रमाणेच स्टायलिश आहे तिची लहान बहीण, पहा फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST
मॉडलिंग वर्ल्डमधून बॉलिवूडमध्ये आलेली अभिनेत्री कायनात अरोरा सध्या अभिनयापासून दूर आहे. ती अखेरीस ‘फरार’ (२०१५) या चित्रपटात बघावयास मिळाली होती. १९८२ मध्ये दिल्ली येथे जन्मलेल्या कायनातला खूपच कमी लोक ओळखतात. ती ९०च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री दिव्या भारतीची सावत्र बहीण आहे. तिला चारू अरोरा नावानेही ओळखले जाते.
दिव्या भारतीप्रमाणेच स्टायलिश आहे तिची लहान बहीण, पहा फोटो!!
मॉडलिंग वर्ल्डमधून बॉलिवूडमध्ये आलेली अभिनेत्री कायनात अरोरा सध्या अभिनयापासून दूर आहे. ती अखेरीस ‘फरार’ (२०१५) या चित्रपटात बघावयास मिळाली होती. १९८२ मध्ये दिल्ली येथे जन्मलेल्या कायनातला खूपच कमी लोक ओळखतात. ती ९०च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री दिव्या भारतीची सावत्र बहीण आहे. तिला चारू अरोरा नावानेही ओळखले जाते. खरं तर दिव्या भारतीची जागा आज इंडस्ट्रीत कोणीच घेऊ शकत नाही. मात्र तिची बहीण कायनात सुंदरतेच्या बाबतीत दिव्यापेक्षा कमी नाही हेही तेवढेच खरे आहे. कायनातही बहिणीप्रमाणेच बॉलिवूडमध्ये तिचे करिअर बनवू इच्छित आहे. २०१० मध्ये तिने सुपरस्टार अक्षयकुमार याच्यासोबत ‘खट्टामिठा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. कायनातने देहरादून येथून शिक्षण पूर्ण केले. पद्वीनंतर तिने दिल्ली येथे नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. कायनातने ‘कॅडबरी’, ‘मारुती’ या ब्रॅण्डसह ‘लक्स’च्या जाहिरातींमध्ये काम केले. लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहणाºया कायनातने बराच काळ मॉडलिंग केल्यानंतर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. कायनातने २०११ मध्ये आलेल्या ‘ग्रॅण्ड मस्ती’मध्येही काम केले. त्याव्यतिरिक्त तिने पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले. कायनातने बºयाच तामिळ चित्रपटांमध्येही काम केले. २०११ मध्ये आलेल्या ‘मनकथा’ आणि रामगोपाल वर्माच्या ‘सीक्रेट’ या चित्रपटात ती झळकली.